आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानात सरकारे पाडली जातात. सरकार आणली जातात, न्यायव्यवस्था विकली गेली. हे चित्र आपल्या देशात असू नये, यासाठी उद्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. सध्या पाकिस्तानात संविधान जळतेय; यांनाही आपला देश त्यांच्यासारखाच चालवायचाय असा घणाघात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला.
उद्या राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आज माध्यमांशी मुंबईत बोलत होते.
उद्या देशाच्या भविष्याचा फैसला
संजय राऊत म्हणाले, माझी प्रतिक्रीया इतकीच आहे की, या देशात लोकशाही आहे की, नाही? हा देश विधानसभा आणि संसदेनुसार काम करतेय की, नाही. न्यायव्यवस्था स्वतंत्र की, कुणाच्या दबावाखाली काम करतेय? याचाही फैसला उद्या होईल. आमदार अपात्र ठरतील. सरकार पडेल. सरकार येईल या गोष्टी राजकारणात घडत असतात. पण या देशाच्या भविष्याचा फैसला होईल. पाकीस्तानमध्ये संविधान जळताना दिसतेय. कारण ते कायद्यानुसार, संविधानानुसार नाही. विरोधकांवर ते सूडबुद्धीने कारवाई करीत होते.
तेथे सरकारे पाडली जातात. सरकार आणली जातात, न्यायव्यवस्था विकली गेली. हे चित्र आपल्या देशात असू नये यासाठी उद्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे.
आम्ही आशावादी
संजय राऊत म्हणाले, देशाचे स्वातंत्र्य हजारो क्रांतिवीर, स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. त्यात डाॅ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या रक्षणासंदर्भातलाही हा निर्णय आहे म्हणून आम्ही आशावादी आहोत. त्यांना हा देश पाकीस्तानप्रमाणे चालवायचा आहे. हे मी जबाबदारीने विधान करतोय.
कायदा, लोकशाहीचा विजय व्हावा
संजय राऊत म्हणाले, निकाल आमच्या बाजूने लागेल असे म्हणत नाही; पण संविधानाचा, कायद्याचा विजय व्हावा. या देशात कायदा, संविधान उरले असेल, न्याययंत्रणेवर कुणाचाही दबाव नसेल तर उद्या न्याय होईल. निकालाविषयी नाही मी न्यायबाबत बोलतोय.
सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र
संजय राऊत म्हणाले, जर कुणी सर्वोच्च न्यायालयाबाबत म्हणत असेल की, ''आम्हीच'' याचा अर्थ त्यांनी काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न केला पण मला अजूनही खात्री आहे की, या देशाचे सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र आहे.
..त्यांनी निर्णय दिला हे विसरलात
संजय राऊत म्हणाले, उद्या सर्वोच्च न्यायालय जे ठरवायचे ते ठरवणारच आहे. त्यामुळे आज कुणी काय म्हणत आहेत, विधानसभेचे अध्यक्ष काय म्हणतात त्याला अर्थ नाही. विधानसभेच्या अध्यक्षपदी घटनात्मक व्यक्ती (नरहरी झिरवाळ) बसली होती. त्यांनी एक निर्णय दिला हे सर्वजण विसरत आहेत. त्यांनी निर्णय दिल्यानंतरही सरकार स्थापन झाले हे लक्षात घ्या. त्यांनी सोळा आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यांचा निर्णय योग्य होता हे मला वाटते.
..तर मला राज्याची चिंता वाटते
संजय राऊत म्हणाले, कायदा एकाच व्यक्तीला कळतो असे नाही. तो जनतेला समजतोच. पण स्वतःला कायदेपंडीत समजणारे विद्यमान विधानसभा अध्यक्ष यांना तसेच असतील वाटत असेल तर या राज्याची मला चिंता वाटते. या देशात लोकशाही, न्यायव्यवस्था आणि संविधानाचा विजय होईल. उद्या एक वाजता नितीश कुमार मातोश्रीवर येतील. त्यानंतर ते दुसऱ्या प्रमुख नेत्यांशी भेटतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.