आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''हजारो मृत्यू नोटाबंदीमुळे झाले. मी प्रकाश आंबेडकर यांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. नोटाबंदी म्हणजे आर्थिक हत्याकांड होते. हजारो लोक बॅंकांच्या रांगेत मृत्यूमुखी पडले. नोटबंदीमुळे बेरोजगारी निर्माण झाली. लाखो लोकांनी आत्महत्या केल्या. याला जबाबदार कोण याचे उत्तर न्यायालयाने दिले नाही.'' असे परखड मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले.
आम्ही एका न्यायमुर्तींच्या बाजूने
संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द केल्या. त्याबाबत त्यांनी कारणे दिली, त्यात काळा पैसा, टेरर फंडींग, अतिरेक्यांना पुरवला जाणारा पैसा, अमली पदार्थाचा बाजार आणि चलनातील बनावट नोटा संपतील असे त्यांनी सांगितले परंतु उलट झाले. दहशतवाद कमी झाला नाही. टेरर फंडींग सुरूच आहे. नोटबंदी वैध कशी हे लोकांच्या मनात प्रश्न आहे. आम्ही चार न्यायमुर्तीं विरुद्ध एक यात आम्ही एका न्यायमुर्तीच्या निर्णयाच्या बाजूने आहोत.
योगींना विरोध नाही
संजय राऊत म्हणाले, उत्तरप्रदेशचे योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन उद्योजकांची भेट घेणार आहेत. त्याला आमचा विरोध नाही. राज्यात गुंतवणूक केली जाणार असेल तर विरोध होऊ नये राज्याचा विकास देशाचा विकास आहे. मात्र इकडले उद्योग पळवून, ओरबडून नेण्याला आमचा विरोध राहील.
मांजरींनाही सुरक्षा
संजय राऊत म्हणाले, राजन विचारे यांनी जे मुद्दे हायकोर्टात उपस्थित केले ते महत्वाचे आहेत. सध्याच्या चाळीस फुटीर आमदारांच्या घरातील कुत्र्यांनाही सुरक्षा आहे. माझ्यासारख्या लोकांची वायप्लस सुरक्षा काढली. रात्रीतून आमच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा काढली. फुटीर आमदारांच्या घरातील मांजरी, कुत्र्यांना सुरक्षा आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घरी फौजच
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या घरात किती सुरक्षा दिली गेली. एवढी फौज तिथे आहे, अनेकदा देशातील सीमेवरील चौकीतही नाही. मी आकडे देऊ शकतो. त्यामुळे राजन विचारेंनी जे मुद्दे हायकोर्टात मांडले ते अत्यंत महत्वाचे आहेत. अर्जुन खोतकरांना मी ओळखत नाही.
आशिष शेलार शंकराचार्य आहे का?
संजय राऊत म्हणाले, आशिष शेलार टीका करीत असेल पण ते देशाचे शंकराचार्य आहे का? हिंदुत्वावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान हा हिंदुत्वाचा अपमान नाही का याचे उत्तर त्यांनी द्यावे.
राज्यपालांना परत पाठवा
संजय राऊत म्हणाले, राज्यपालांना परत पाठवा. शिवरायांचा ते अपमान करतात ते महाराष्ट्रातील राज्यपाल पदावर कसे बसू शकतात. राज्यपालांच्या वक्तव्याचा सीएम शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी निषेध केला नाही.
संभाजीराजे पंचप्राण
छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक, धर्मवीर महाराष्ट्राचे पंचप्राण आहेत. पण त्यांचे वडील या देशाचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तुम्ही कसा विसरता. आधी शिवरायांच्या अपमानाबाबत न्याय होईल. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस व त्यांचे गट तसेच पक्ष छत्रपती शिवरायांच्या अपमानाबाबत रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करू.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.