आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात कसे वाद सुरू आहे. त्यांच्या गटात अजून एक गट निर्माण झाला आहे. केसरकरांनी आत्मपरीक्षण केले म्हणून ते एकत्र येण्याची भाषा करताय. मात्र शिवसेनेत त्यांना जागा नाही असेही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात कसे वाद सुरू आहे, कशी घालमेल सुरू आहे हे सर्वांना माहिती आहे. मी वारंवार सांगतो आहे की हे सरकार टिकणार नाही, आणि हा गटही टिकणार नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तर यांचे अंतिम ध्येय भाजपमध्ये विलीन होणे असल्याचेही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत काय म्हणाले?
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, शिवसेना सोडून शिंदेंसोबत गेलेल्या 40 आमदारांमधील अर्धे आमदार हे स्वत:ला विलीन करुन घेतील, तेच त्यांचे अंतिम ध्येय आहे. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. कारण त्यांना पुन्हा शिवसेना स्वीकारणार नाही, आणि त्यांना दुसरा पर्याय नाही असे म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, दीपक केसरकरांना वाटतंय दोघांनी सोबत यावे, याचा अर्थ असा की त्यांनी आत्मपरिक्षण केले आहे. त्यामुळेच असे विधान बाहेर पडताय. शिंदे गटात टोळी युद्ध सुरू आहे असेही राऊतांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांचे वक्तव्य म्हणजे वैफल्यग्रस्त असून त्यांच्यामध्ये अजून गट पडले असल्याचे दिसून येत आहे. तर 16 आमदार अपात्र ठरतील कारण आमची कायदेशीर बाजू अगदी सक्षम आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
शिंदे गट तात्पुरती सोय
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात जर भाजपचे 145 जण असतील तर शिंदे गटाचे लोकं काय धुणीभांडी करायला ठेवणार का? भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही यांना कुणी उभे करत नाही, असा टोला लगावला आहे. ही केवळ तात्पुरती सोय आहे म्हणत असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.