आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे परत येण्याचा राऊतांना विश्वास:म्हणाले- होऊन होऊन काय होईल सत्ता जाईल! शिंदेंचं बंड घरातलं, गैरसमज दूर होतील

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे बंड हा घरातला विषय आहे. एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरेंपासून आतापर्यंत त्यांनी शिवसेनेचे काम झाले आहे. त्यामुळे आम्हाला पुन्हा खात्री आहे की एकनाथ शिंदे परत येतील, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. सेना आमदार काझीरंगातील जंगल पाहायला गेले आहेत. त्यांनी तेथील पर्यटनाचा आनंद घ्यावा. त्यांना माझ्या शुभेच्छा, असेही संजय राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, शिवसेनेत काही झाले आहे, असं कुणाला आनंदाचं भरत येऊ देऊ नका. काही समज-गैरसमज असतात ते दूर होतील. जर भाजपला असे वाटत असेल की, शिवसेना पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळेल, तर त्यांनी लक्षात घ्यावे की, शिवसेना हा राखेतून भरारी घेणारा पक्ष आहे. आणि शिवसेनेने अनेकदा राखेतून भरारी घेतली आहे. हा गेल्या ५६ वर्षाचा इतिहास आहे.

शिंदेसोबत जिव्हाळ्याचे संबंध

राऊत म्हणाले की, राज्यपालांना बरे वाटू द्या, मग संख्याबळाचे पाहू. हा आमच्या घरातील प्रश्न आहे त्याच्याशी आमचा व्यवस्थित संवाद सुरू आहे. आम्ही एकत्र आहोत. एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार परत येतील. एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत. आज सकाळीच माझे आणि त्यांचे बोलणे झाले आहे. सकारात्मक चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही अटी- शर्थी नाहीत. त्यांच्याशी माझे आणि सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. यामुळे ज्या काही गोष्टी समोर येत आहेत, त्यात काहीही तथ्य नाही.

शिंदे सांगतील तसे निर्णय होतात

ठाणे मनपा आणि त्या परिसरातील निवडणुका एकनाथ शिंदे सांगतील तसे निर्णय घेतले जातात. कारण ते तेथील नेते आहेत. त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही अटी- शर्थी नाहीत, असेही राऊत म्हणाले.

आज मविआची बैठक

संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पाठीमागून कोणताही वार करत नाही. जे काही करायचे आहे ते समोरुन करते. शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. आज उद्धव ठाकरे, पवार साहेब आणि काँग्रेसची बैठक होईल, त्यात ते योग्य तो निर्णय घेतील.