आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेश लुटणारे, भ्रष्ट्राचारी वाशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करून भाजपमध्ये घेत आहेत. सकाळचा देशद्रोही, गद्दार जेव्हा भाजपमध्ये सामिल होता, तेव्हा त्याला गद्दार आणि देशद्रोही म्हणत नाही तर तो देशभक्त होतो. अशा बोगस देशभक्तांची फौज घेवून ते आमच्याशी लढायला आले आहे असे टीकास्त्र ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सोडले.
यासह वज्रमूठ जशी सभेत आहे, तशी व्यासपीठावर आहे. महाराष्ट्राची मजबूत वज्रमूठ महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते आज मुंबईत बीकेसी मैदानावर आयोजित मविआच्या वज्रमूठ सभेत बोलत होते.
त्यांचे डोळे चिनी
संजय राऊत म्हणाले, आशिष शेलारांचे डोळे चीनी आहेत. येऊन पाहा ही काय ताकद आहे. या सभेने निकाल दिला. मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसांची आमच्या बापांची आहे. काल देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊन गेले. आमची ताकद पाहा. निष्ठा पाहा आणि आमची वज्रमूठही पाहा. हम सब एक है और एक रहेंगे. अजित पवार बसलेले आहेत. सर्वांना तुमचे आकर्षण आहे. आम्ही म्हणतो दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार.
काम की, बात केलीच नाही
संजय राऊत म्हणाले, काल देशात मन की बात हा इव्हेंट झाला. मन की बात काय? या देशाचा एकमेव पंतप्रधान पाहीला की, मन की बात करतोय, काम की बात करीत नाही. पण हा महाराष्ट्राची वज्रमूठ सभा यापुढे काम की बात करेल.
तुमच्या बापांना घाबरत नाही
संजय राऊत म्हणाले, मुंबईचे लचके तोडले जात आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव. त्यामुळे शिवसेनेचेही लचके तोडण्याचे प्रयत्न होत आहे. कितीही लांडगे आले तरीही शिवसेना मुंबईत पाय रोवून राहणार आहे. कारण शिवसेनेची ताकद काॅंग्रेस, राष्ट्रवादी, दलित आणि मुस्लीम बांधव सोबत आहे. आम्ही आत जावून आलो तुमच्या बापांनाही घाबरत नाही.
भाजपने भ्रष्ट्राचारी धुवून स्वच्छ केले
संजय राऊत म्हणाले, देश लुटणारे, भ्रष्ट्राचारी वाशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करून भाजपमध्ये घेत आहेत. देशद्रोही, गद्दार जब भाजपमध्ये सामिल होता है तो उसे गद्दार और देशद्रोही नही तो देशभक्त होता है. अशा बोगस देशभक्तांची फौज घेवून ते आमच्याशी लढायला आले आहे. वज्रमूठ सभेत तशी व्यासपीठावर आहे. महाराष्ट्राची मजबूत वज्रमूठ महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर येईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.