आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्योगपती गौतम अदानी यांचा सध्या जो एक घोटाळा समोर येत आहे, त्यामध्ये सत्ताधारी पक्ष भाजपचा थेट संबंध आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, देशात गेल्या 50 वर्षांत असा स्कॅम झाला नाही. या घोटाळ्याशी सत्ताधारी पक्षाचा थेट संबंध आहे. या मुद्द्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक सरकारला जाब विचारणार आहेत.
एकाही भाजप नेत्याने आवाज उठवला नाही
संजय राऊत म्हणाले, भाजप नेत्यांकडून नेहमी विरोधकांवर मनी लाँड्रिंग, शेल कंपन्यांचा आरोप केला जातो. विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआयच्या धाडी लावल्या जातात. आताही एका उद्योजकाच्या सिंगापूर, मॉरिशस येथे शेल कंपन्या असल्याचे समोर येत आहे. यावर एकाही भाजप नेत्याने अद्याप आवाज का उठवला नाही? केवळ विरोधकांवर आरोप करुन त्यांना कैदेत ठेवण्यासाठीच तुरुंग बनवले आहेत काय?
FPO तून उभारलेले 20 हजार कोटी अदानी परत करणार:रात्री उशीरा FPO रद्द केला
आज संसदेत आवाज उठवणार
संजय राऊत म्हणाले, आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या दालनात विरोधकांची बैठक होत आहे. या बैठकीत अदानी घोटाळ्यावरुन सरकारला घेरण्याची रणनिती बनवण्यात येणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक आवाज उठवणार आहेत.
सामान्यांच्या पैशांचे काय?
संजय राऊत म्हणाले, शेअर मार्केटवरुन देशाचा विकास अधोरेखित करण्याचा कट रचला जात आहे. खरे तर शेअर मार्केट आणि सामान्यांचा काही संबंध नाही. सामान्यांनी मोठ्या विश्वासाने आपले पैसे एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडियात गुंतवले आहेत. मात्र, हे सरकार या पैशांचा शेअर मार्केटमध्ये इतरांसाठी वापर करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अदानीसारखे घोटाळे समोर आल्यानंतर सामान्यांच्या पैशांचे काय?, याचा जाब आम्ही सरकारला विचारणार आहोत. भाजप देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त करण्याचे काम करत आहे.
शिक्षक, पदवीधर निवडणूक मविआच जिंकणार
शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांचे निकाल आज लागणार आहेत. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यावर संजय राऊत म्हणाले, पाचही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील. गेल्या निवडणुकीत मविआचे जेवढे उमेदवार होते, त्यापेक्षा अधिक शिक्षक, पदवीधर आमदार आता असतील.
मुंबईला हलवाभर चमचाही मिळाला नाही
केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, मुंबई व महाराष्ट्रासाठी आम्ही अनेक मागण्या केल्या होत्या. मात्र, चमचाभर हलवाही वाट्याला आला नाही. हे पूर्णपणे भाजपच्या निवडणुकीचे बजेट होते. मुंबईचे औद्योगिक अध:पतन करण्याचे कारस्थान, या बजेटमधून समोर येत आहे. मात्र, आम्ही तसे होऊ देणार नाही.
संबंधीत वृत्त
शिवसेनेकडून अर्थसंकल्पाची चिरफाड:4 वर्षे खिसे कापायचे आणि निवडणुकीच्या पाचव्या वर्षात थोडी चिल्लर टाकायची, असा प्रकार
सरकारच्या राजवटीत पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दुपटीने वाढलेले भाव आणि आज प्राप्तिकरात दिलेली फुटकळ सवलत यांचा कुठेच मेळ बसत नाही, अशा शब्दांत आज शिवसेनेकडून केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका करण्यात आली आहे. चार वर्षे खिसे कापायचे आणि निवडणुकीच्या पाचव्या वर्षात त्याच खिशात थोडी चिल्लर टाकायची, असा हा प्रकार असल्याची खिल्ली शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून उडवण्यात आली आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.