आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या सुरक्षा व्यवस्थेचेही राजकारण सरकार करत आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देशाच्या सीमा उघड्या पडल्या, शत्रू घुसले तरी चालतील, ही घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.
नेमके काय म्हणाले पवार?
खासदार संजय राऊत म्हणाले की, भारत-चीन सीमेवर पुन्हा तणाव वाढला आहे. चीनचे सैन्य गुजरात निवडणूक होईपर्यंत वाट पाहत होते का? चीनच्या सैन्याला शांत राहायला सांगितले होते? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर चीनसारखा क्षत्रू तिन्ही बाजूने घूसत असताना त्यांवर लक्ष दिले तरच खरी देशसेवा होईल असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. तर लडाख, डोकलामनंतर तवांग आले, देशाच्या राजकर्त्यांनी राजकारणाकडे लक्ष कमी देऊन देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत, त्याकडे लक्ष दिले पाहिजे असेही राऊत यांनी म्हटले आहे.
सत्य काय समजत नाही
संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री देशापासून काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार राजकारणात गुंतल्याने चीन, पाकिस्तान आणि इतर शत्रू सीमेवर धडका मारतायेत, या घटनेचे सरकारला गांभीर्य नसल्याचा आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केला आहे. 8 दिवसानंतर हे समोर आले. जखमी सैनिक आसामच्या गुवाहाटीत उपचार घेतायेत. सत्य काय ते कळायला मार्ग नाही.
चीनचा अरुणाचल प्रदेशावर दावा
संजय राऊत म्हणाले की, चीनकडून अरुणाचल प्रदेशावर दावा सांगितला जात आहे. चीनच्या नकाशात तवांग त्यांचा प्रदेश दाखवला जात असताना मात्र, स्थानिकांनी तवांग भारताच्या नकाशावर ठेवले आहे. सरकारने तिथे गांभीर्याने काम करणे गरजेचे होते, पण ते दिसत नाही असेही संजय राऊत म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.