आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसवराज बोम्मईंच्या बोलण्याने फरक पडत नाही:संजय राऊतांचे प्रत्युत्तर, शिंदे सरकारच्या तोंडाला कुलूप अन् चावी दिल्लीत असल्याची टीका

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई काहीही बरळले तरी फरक पडत नाही. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लढाईत का उतरत नाहीत?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही या बसवराज बोम्मईंच्या वक्तव्याचा आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी समाचार घेतला. तसेच, यावरून शिंदे गटावरही टीका केली. संजय राऊत म्हणाले, कर्नाटकच्या अत्याचाराविरोधात ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, शिंदे सरकारच्या तोंडाला कुलूप लागले आहे. आणि त्याची चावी दिल्लीत आहे.

बसवराज बोम्मई बरळले :एक इंचही जमीन देणार नाही, महाराष्ट्राचे शिष्टमंडळ अमित शहांना भेटल्याने फरक पडत नाही

शिंदे सरकार दिसतच नाहीये

संजय राऊत म्हणाले, बसवराज बोम्मई सातत्याने महाराष्ट्राविरोधात बरळत आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात शिंदे-फडणवीस सरकार लढाईत उतरणार की नाही? या लढाईत सरकार कुठेच दिसत नाहीये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटाच्या आमदार, खासदारांनी अद्याप तोंड उघडलेले नाही. कालदेखील मविआचेच खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले व सीमावादावर आपली भूमिका मांडली. लोकसभेतही मविआचेच खासदार कर्नाटकच्या अत्याचाराविरोधात बोलले.

शिंदे गट पळपुटा

संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाचे खासदार पळपूटे आहेत. त्यामुळेच कर्नाटकात भाजप सरकार सत्तेत असल्याने ते तोंड उघडत नाही. त्यांच्या तोंडाला कुलूप आहे आणि त्याची चावी दिल्लीत आहे. खरे तर शिंदे गटाला ढाल-तलवार ही चुकीची निशाणी भेटली आहे. चावी-कुलूप हीच त्यांची निशाणी हवी, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

अमित शहा काय मध्यस्थी करणार?

संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाचे खासदार म्हणतात अमित शहा सीमावादावर मध्यस्थी करतील आणि आम्ही त्यांचे ऐकू. मात्र, अमित शहा नेमकी काय मध्यस्थी करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खरे तर मुख्यमंत्र्यांनी आता सीमावादावर बोललं पाहीजे. कर्नाटक सरकारला प्रत्युत्तर दिले पाहीजे. सीमावादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता कठोर व ठाम भूमिका घेण्याची वेळ आली आहे. अन्यथा सीमावाद पेटलेला असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प होते, अशी त्यांची नोंद इतिहासात होईल.

भाजपमध्ये अकलेचे कांदे

शाळा उभारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागितली, असे वादग्रस्तव वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यावरही संजय राऊत यांनी सडकून टीका केली. संजय राऊत म्हणाले, भाजपमध्ये अकलेचे कांदे भरले आहेत. या महापुरुषांनी लोकवर्गणीतून दलितांसाठी शाळा उभारून मोठे समाजकार्य केले. महात्मा फुले त्या काळात टाटांपेक्षाही श्रीमंत होते. मात्र, भाजप नेत्यांना हा इतिहासच माहिती नाही.

बातम्या आणखी आहेत...