आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल:म्हणाले- '1-2 मतांसाठी अखेरच्या घटका मोजणाऱ्यांनाही सोडले नाही'

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील कसबापेठ विधानसभा आणि चिंचवडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणी सुरु आहे. यापूर्वीच खासदार संजय राऊत यांनी कसबा मतदार संघात भाजपचा गड कोसळणार असून विजयाचा दावा केला आहे. चिंचवडमध्येही घाम फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.

संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडी मजबुतीने पुढे जात आहे. याचे कसबा निवडणुक ज्वलंत उदाहरण आहे. ज्या कसब्यात गेल्या 40 वर्षांपासून शिवसेनेच्याच पाठिंब्याने होत आला. आता शिवसेना ही महाविकास आघाडीचा घटक आहे. आणि त्याचा फरक कसब्यात दिसून येत आहे. चिंचवड मतदारसंघात सुद्धा भाजपला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही.

संजय राऊत म्हणाले, कसब्याविषयी आम्ही खात्रीने सांगत होतो कि भाजपचा गड कोसळणार. चिंचवडमध्ये कुटुंबाची मक्तेदारी आहे. चिंचवडमध्ये पक्षापेक्षा जगताप पॅटर्न चालतो. तिथे भाजपची चालत नाही. अखेरच्या घटका मोजत असताना मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांना विधीमंडळात आणले होते. जनतेला हे आवडत नाही. हे अमानुष राजकारण आहे. तुमच्या एक-दोन मतांसाठी तुम्ही ज्यांना चालता येत नाही अशांना आणले. हे योग्य नव्हते.

पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झालेली आहे. कसब्यात दहाव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर यांनी एकूण 38263 मते मिळवून आघाडीवर आहे. भाजपच्या हेमंत रासने यांना 34036 मते मिळाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...