आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेत युतीची चर्चा सुरू आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत आल्यास राज्यासह देशात परिवर्तन दिसेल असे सांगताना मविआला या चर्चेची पूर्ण कल्पना आहे. कुणाचा विरोध आहे कुणाचा नाही हे भविष्यात कळेल. मला असे वाटत नाही प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात एकवटले आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यापासून कुणी रोखणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत म्हणाले की, आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र मानतो असे प्रकाश आंबेडकर ज्यांच्या मागे मोठा वंचित समाज उभा आहे, असे नेते प्रकाश आंबेडकर आहेत. त्यांच्याशी उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात अनेक जण एकवटले आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यापासून कुणी रोखणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. यामुळे देशात परिवर्तनाची नांदी सुरू होइल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य हे खूप सकारात्मक असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात काम करताय, म्हणून आमची अशही इच्छा होती की शिवशक्ती आणि भीमशक्ती ही एकत्र यावी कारण ही महाराष्ट्रासह देशाची ताकद आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, देशात सध्या ज्या प्रकारचे सत्ताकारण सुरू आहे ते उलथवायचे असेल तर या दोन शक्ती एकत्र येण गरजेचे आहे. आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या स्वागताला तयार आहोत. जोगेंद्र कवाडे आणि शिंदे गटाच्या युतीवर बोलण्यास मात्र राऊतांनी टाळले.
दिपक केसरकरांना टोला
संजय राऊत म्हणाले की, आम्ही पळपुटे नाही, आमच्या पक्षासाठी महाराष्ट्रासाठी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही लफगें नाहीत असे म्हणत त्यांनी दिपक केसरकरांना टोला लगावला आहे. केसरकर हे कायदा किंवा न्यायालय नाहीत, ते जर असे बोलले असतील तर त्यांनीही जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी सर्व तयार असल्याचा इशाराच संजय राऊतांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.