आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर संसदेत आरोप केले आहेत. खासदार राहुल शेवाळेंचा हा आरोप म्हणजे नीचपणा आहे, अशी ठीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
नीचपणाचा कळस
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, खासदार राहुल शेवाळे हे शिवसेनेच्या ताटात जेवले आहेत. शिवसेनेतच त्यांची वाढ झाली आहे. तेच शेवाळे आज आदित्य ठाकरेंवर बिनबुडाचे आरोप करत आहेत, ही नीचपणाचा कळस आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांनी आत्महत्या केलीये, हे सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
राहुल शेवाळेंवरच बलात्काराचे आरोप
संजय राऊत म्हणाले, खासदार राहुल शेवाळेंवरच विनयभंगासह बलात्काराचे आरोप झाले आहेत. त्यांनी आता आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यापूर्वी स्वत:च्या अंतर्मनात झाकून पाहीले पाहीजे. फुटील लोक किती खालच्या थरावर जाऊ शकतात, हे आता स्पष्ट होत आहे.
शिंदेंवरील आरोपांमुळे धावपळ
संजय राऊत म्हणाले, गेले दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नागपूर भूखंड घोटाळ्याचे आरोप होत आहे. त्यामुळे या आरोपांपासून बचावासाठी शिंदे सरकारची पळापळ, धावपळ सुरू आहे. या आरोपांकडून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच आदित्य ठाकरेंवर असे खालच्या थरावर आरोप केले जात आहेत. हे सरकारच भ्रष्ट मार्गाने सत्तेत आले आहे. मात्र, आमची माणस फोडली, आम्हाला तुरुंगात पाठवले तरी आम्ही खचणार नाही. शिंदे सरकारचे हे औटघटकेचे राज्य आहे. त्यामुळेच त्यांचे असे खेळ चालू आहेत.
बिहार पोलिस कोण?
संजय राऊत म्हणाले, बिहार पोलिस आता या प्रकरणाची फाईल उघडणार, अशी चर्चा सुरू आहे. बिहार पोलिस आहेत कोण? एकदा केंद्रीय तपास संस्था सीबीआयने क्लिन चिट दिल्यानंतर बिहार पोलिस कसा काय तपास करू शकते? भाजपचा महाराष्ट्र पोलिस तसेच सीबीआयवरही विश्वास नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
फाईलींमुळे अडचणीत याल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारविरोधात सध्या राज्यातील लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात असे घाणेरडे राजकारण सुरू आहे. त्यातून पुन्हा फाईलींची लढाई सुरू झाली तर सरकारला गरम पडेल, अशा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.