आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे - फडणवीस सरकारने किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता उगाच पेढे वाटू नये. आपण बेकायदेशीर सरकारचे प्रतिनिधित्व करत आहात नैतिकता असेल तर आपण राजीनामा द्यावा असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. घटनाबाह्य आहे यावर सुप्रीम कोर्टाने यांच्यावर शिक्कामोर्तब केला आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाने शिवसेनेवरचा दावा फेटाळला ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे. सत्ता येते सत्ता जाते मात्र, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर कुणी ऐरा, गैरा, लफगा, चोर, दरोडेखोर ही शिवसेनेवर आणि धनुष्यबाणावर दावा करू शकत नाही, या आमच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला आहे.
दिशा देणारा निकाल
सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल देशाला, देशाच्या लोकशाहीला महाराष्ट्राला दिशा देणारा आहे. आम्ही सु्रपीम कोर्टाचे आभारी आहोत. शिंदे गटाने नेमलेला व्हीप बेकायदेशीर आहे. सुनील प्रभू हेच कायदेशीर व्हीप आहे.
सुनील प्रभू कायदेशीर व्हीप
सुनील प्रभू यांचे कायदेशीर व्हीप असल्याचे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे.तर त्या व्हीप नुसार हे आमदार अपात्र ठरले आहेत. फक्त तो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे. विधानसभा अध्यक्ष बेकायदेशीर व्हीपचे पालन करू शकत नाही. न्यायालयाने सांगितले आहे की व्हीपची खातरजमा करुन विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायला हवा होता. हा त्यांना दिलासा कसा म्हणता येईल, हे बेकायदेशीर सरकर आहे.
सरकार पूर्णपणे बेकायदेशीर
सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. घटनाबाह्य आहे यावर सुप्रीम कोर्टाने यांच्यावर शिक्कामोर्तब केला आहे. शिंदे गटाने बजावलेला व्हीप हा बेकायदेशीर आहे, तर त्यापुढे झालेली सर्व प्रक्रिया बेकायदेशीर आहे.
पक्षावर दावा करता येणार नाही
संजय राऊत म्हणाले की, कोणत्याही गटाला शिवसेनेवर पक्षावर दावा करता येणार नाही. राज्यपालांनी घेतलेली भूमिका ही घटनाबाह्य आहे. उद्धव ठाकरेंनी जर राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा बसवले असते. हे सरकार 100 टक्के घटनाबाह्य आहे. 16 आमदारांचा निकाल जर विधानसभा अध्यक्षांकडे आला असेल तर येऊ द्यात, व्हीप आणि प्रक्रियाच बेकायदेशीर असेल तर राहुल नार्वेकर यांनी घटनेनुसार आणि लोकशाहीनुसार योग्य निर्णय घ्यायला हवा आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.