आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतच्या मृत्यूवर राजकारण:संजय राउत म्हणाले- सुशांत सिंह राजपूत आमच्या मुलासारखाच होता, कुटुंबियांनी मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीआय कशाला मोसाद आणि केजीबीला गुंतवा; सीबीआय चौकशीची परवानगीच बेकायदेशीर -राउत

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राउत यांनी पुन्हा आपले मत मांडले आहे. या प्रकरणाचा सध्या मुंबई पोलिस तपास करत असून सुशांतच्या कटुंबियांनी मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा. तरीही आपल्याला योग्य वाटत नसेल तर मग सीबीआय आणि इतर तपास संस्थांकडे जावे. सुशांत सिंह राजपूतचा आमचाही मुलगाच होता. एक अभिनेता बॉलिवूडचा एक घटक असतो आणि बॉलिवूड तर मुंबईतील एक परिवार आहे. आमचे त्यांच्यासोबत वैर काय? असा सवाल राउत यांनी उपस्थित केला.

लोक सरकारला काम करू देत नाहीत

संजय राउत पुढे बोलताना म्हणाले, "कुटुंबियांना न्याय मिळावे ही आमची इच्छा आहे. पण, तेथे बसून तुम्ही आमच्यावर हल्ले करत असाल सरकारला काम करू देत नसाल तर मग गोंधळ होईल. सुशांतच्या कुटुंबियांची आम्हाला सहानुभूती आहे."

सीबीआय चौकशीची परवानगी बेकायदेशीर

तत्पूर्वी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना संजय राउत यांनी तपास होत नाही तोपर्यंत सुशांतच्या कुटुंबियांनी शांत राहावे. सुशांतचा मृत्यू मुंबईत झाला आहे. तरीही पाटण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यात बिहारने सीबीआय चौकशीची शिफारस केली आणि केंद्राने लगेच सीबीआय चौकशीला मंजुरी दिली. हे अक्षरशः बेकायदेशीर आहे. तांत्रिकदृष्ट्या हे प्रकरण सीबीआयकडे आहे.

सीबीआय कशाला मोसाद आणि केजीबीला गुंतवा

संजय राउत एवढ्यातच थांबले नाहीत. आम्ही सीबीआय चौकशीला विरोध करत नाही. पण मुंबई पोलिस तपास करतच आहे. त्यात सीबीआय काय करणार? लपवण्यासारखे काहीच नाही. यापेक्षा मोसाद आणि केजीबींना (इस्रायल आणि रशियाच्या गुप्तचर संस्था) देखील यात गुंतवा. अशी खोचक टीका राउत यांनी केली.

उल्लेखनीय बाब म्हणजे, संजय राउत यांनी सुशांतच्या प्रकरणाला त्याच्या वडिलांसोबत असलेल्या कथित वादाशी जोडून पाहिले होते. राउत यांनी लिहिलेल्या रोखठोकमध्ये असा दावा केला होता की सुशांतच्या वडिलांचे दोन लग्न झाले. त्यावरून पिता-पुत्रामध्ये नाराजी होती. परंतु, सुशांतच्या कुटुंबियांनी हा दावा खोटा ठरवला आहे. सोबतच, सुशांतच्या चुलत भावाने राउत यांना नोटीस पाठवून 48 तासांच्या आत माफी मागण्यास सांगितले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना अशा हजारो नोटिसा येतात. माफी मागणार नाही असे राउत यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...