आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणातील उत्तम चेहरा:मुख्य नेता, पंतप्रधानपदाचा उमेदवार नंतर ठरवू, आधी निवडणूक लढवू - संजय राऊत

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय राजकारणातील उत्तम चेहरा आहे. देशातील मुख्य विरोधी नेता, पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे नंतर ठरवू. आधी निवडणूक लढवू असे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. याशिवाय ठाकरे विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याचेही ते म्हणाले. राऊत आज माध्यमांशी बोलत होते.

भाजपविरोधी पक्षाशी संवाद

उद्धव ठाकरे भाजपविरोधी पक्ष, नेत्यांशी संवाद साधत आहेत. हा संवाद कायम सुरू आहे. 2024 ची तयारी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन का करू नये. आपण सोबत आलो तरच लढाई सोपी होईल. राष्ट्रीय राजकारणात उद्धव ठाकरे जे जे शक्य आहे ते ते करतील. दिल्लीत शिवसेनेचे स्थान आजही महत्वाचे आहे जरी आमच्याकडील खासदार फूटले असले तरीही.

दबदबा कायम ठेवू

संजय राऊत म्हणाले की, आमचा लोकसभा निवडणुकीत दबदबा कायम ठेवू. राजकारणात काहीही घडू शकते. उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणातील उत्तम चेहरा आहे. मविआने ठरवले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर एकत्र येऊ. ठाकरे हे हिंदुत्ववादी, महाराष्ट्रीयन आहेत. देशातील मुख्य नेता कोण हे नंतर ठरवू आधी निवडणुका लढवू. प्रधानमंत्री कोण हे नंतर ठरवले जाईल.

एकजूटीसाठी पवारांचेही प्रयत्न

संजय राऊत म्हणाले, विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. ही तत्काळ होणारी प्रक्रीया नाही. शरद पवार आणि काही प्रमुख नेते यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वांना वाटत आहे की, एकत्र असावे. या सर्वांचा नेता आज ठरवणार नाही. एकत्र बसलो तर ठरेलही.

सर्वांना राज्य प्रिय

संजय राऊत म्हणाले, गुजरात निवडणुका झाल्या तेव्हा मोदी, अमित शहा राज्यातच होते. प्रत्येकांना आपले राज्य प्रिय आहे. ते पंतप्रधान आहे म्हणून दिल्लीत आहेत अन्यथा ते राज्यातच असते.

पैशांच्या बळावर शिवसेना तोडली

संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे विरोधी पक्षाचा मोठा चेहरा आहे. जो संघर्ष महाराष्ट्रात चालतोय. आमच्या संघटनेला पैशांच्या बळावर तोडले. तरीही आमचा संघर्ष चालत आहे हे देश पाहतोय. आजही उद्धव ठाकरे विरोधी पक्षाचे सर्वात विश्वासू आणि ताकदवान चेहरा आहे.

सर्वांना भाजपची घौडदौड रोखायचीय

संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडी राज्यात आम्ही तयार केली व सरकार बनवले. आम्ही सरकार चालवले. आघाडी राष्ट्रीय स्तरावर होईल. त्यात काॅंग्रेस असणे आवश्यक आहे. सर्वांना वाटते की, भाजपला आपल्या आपल्या पातळीवर रोखावे.

संकटे आले की, उद्धव ठाकरेच लढतात. देशातील

बातम्या आणखी आहेत...