आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राउतांची प्रतिक्रिया:पीएम केअर फंडात बेहिशोबी पैसे पडून; मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करा, संजय राउतांची मागणी

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेताना शेतकऱ्यांची माफी मागितली. मात्र नुसती माफी काय कामाची? पीएम केअर्स फंडातून आर्थिक मदत दिली पाहिजे अशी मागणी आता शिवसेना खासदार संजय राउत यांनी केली आहे. तुमच्या चुकीमुळे 700 पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबाना नुकसान भोगावे लागते आहे. असे देखील संजय राउत यांनी म्हणाले.

काय म्हणाले संजय राउत?
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी गेली वर्षभर आंदोलने केली. सरकार ऐकायला तयार नव्हते. मात्र शेतकऱ्यांनी एकजूट केली, या एकजुटीपुढे सरकार नमले. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. 700 हून अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला. आता केंद्र सरकारने या कुटुंबाना मदत द्यावी? अशी मागणी होत असेल त्यात गैर काय?

पीएम केअर फंडात बेहिशेबी पैसे पडले आहेत. त्यातून या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत केली गेली पाहिजे. देशाची आणि शेतकऱ्यांची नुसती माफी मागून चालणार नाही. तुम्ही जी चूक केली त्याची शिक्षा या कुटुंबाना भोगावी लागते आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे असे संजय राउत यांनी म्हटले आहे.

कायदे रद्द करताना काय म्हणाले होते पंतप्रधान?
'मी आज देशवासीयांची माफी मागतो. खऱ्या मनाने आणि पवित्र ह्रदयाने सांगू इच्छितो की आमच्या तपश्चर्येत काही तरी कमी राहिली. सत्य आम्ही काही शेतकरी बांधवांना समजून सांगू शकलो नाही. आज गुरूनानकजींचा पवित्र प्रकाश पर्व आहे. ही वेळ कुणाला दोष देण्याचा नाही. मी देशाला हे सांगण्यासाठी आलो की, तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.' असे मोदी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...