आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातब्बल 102 दिवसांनंतर कारागृहातून सुटल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत. लवकरच त्यांची भेट घेणार, असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.
विशेष म्हणजे सुटकेनंतर आज प्रथमच माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाची तोफ समजल्या जाणाऱ्या राऊतांनी आपण ईडी तसेच केंद्रीय तपास यंत्रणावर कोणतीही टीका करणार नसल्याचे म्हणाले. तसेच, मी कारागृहात असताना देवेंद्र फडणवीसांनी काही चांगले निर्णय घेतले, असे कौतुकही राऊतांनी केले.
तुरुंगात राहणे सोपे नाही
संजय राऊत म्हणाले, जेलमध्ये राहणे सोपे नसते. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वीर सावरकर अंदमानात, लोकमान्य टीळक मंडालेच्या तुरुंगात तसेच अटलबिरारी वाजपेयीदेखील आणीबाणीच्या काळात तुरुंगात कसे राहिले असतील, याचा विचार मी कोठडीत असताना करत होतो.त्यांच्या प्रमाणेच मी कोठडीत एकांत अनुभवला. मात्र, बाहेर आल्यानंतर लोकांनी, कार्यकर्त्यांनी मला अतिशय प्रेम दिले.
3 महिन्यांनी हातात घड्याळ
संजय राऊत म्हणाले, सकाळीच मला उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. शरद पवारांनीही फोन करुन माझ्या तब्येतीबाबत विचारपूस केली. लवकरच या दोन्ही नेत्यांची भेट घेणार आहे. तसेच, तुरुंगातून सुटल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी हातात घड्याळ बांधली, असा टोलाही राऊतांनी लगावला.
फडणवीसांनी चांगले निर्णय घेतले
संजय राऊत म्हणाले, अशा प्रकारचे राजकारण देशाने कधीच पाहिले नाही. पारतंत्र्यातही शत्रुंसोबत चांगला व्यव्हार केला जायचा. मात्र, मी संपूर्ण यंत्रणेलाच दोषी ठरवणार नाही. केवळ विरोधासाठी मी विरोध करणार नाही. मी तुरुंगात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले निर्णय घेतले. म्हाडाला पुन्हा अधिकार बहाल करण्याचा फडणवीसांचा निर्णय अतिशय चांगला आहे. आमच्याच सरकारने म्हाडाचे अधिकार गोठवले होते. त्यात काही त्रुटी होत्या. मात्र, पुन्हा ते अधिकार बहाल करुन फडणवीसांनी अतिशय चांगला निर्णय घेतला.
राजकारणात तुरुंगात जावंच लागतं
संजय राऊत म्हणाले, माझ्या सुटकेमुळे संपूर्ण देशात चांगले वातावरण तयार झाले आहे. ज्यांनी माझ्याविरोधात कटकारस्थान रचले, त्यांच्याही आनंदात मी सहभागी आहे. ईडीवर मी काहीही टीप्पणी करणार नाही. कुणाविरोधातही माझी खंत नाही. राजकारणी लोकांना एकदा तरी तुरुंगात जावच लागत. मीही गेलो. मात्र, या काळात कुटुंबाने खुप काही भोगलं.
मोदी, शहांना भेटणार
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता कमी झाली पाहीजे, या फडणवीसांच्या वक्तव्याचे मी स्वागत करतो. महाराष्ट्रात सर्वच नेते एकमेकांशी सातत्याने भेट घेत असतात. मीदेखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचीही लवकरच भेट घेणार आहे. माझी सुटका झाल्याने देशाच्या न्यायव्यस्थेवरील आपला विश्वासही वाढला असल्याचे राऊत म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.