आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sanjay Raut Press Conference Today 4 Pm | Marathi News | Shiv Sena Strikes Shaddu Against BJP; Raut To Detonate 'bomb' Today, Special Press Conference At Shiv Sena Bhavan

संजय राऊत कोणता बॉम्ब फोडणार?:भाजपविरोधात शिवसेनेने ठोकला शड्डू; राऊत आज ‘बॉम्ब’ फोडणार, शिवसेना भवनात विशेष पत्रकार परिषद

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेसह आघाडी सरकारमधील मंत्र्यांमागे ईडीसोबतच विविध केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा मागे लागल्याने शिवसेनेने आता भाजपविरोधात शड्डू ठोकला असून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत मंगळवार, १५ फेब्रुवारी रोजी दादरच्या शिवसेना भवनात विशेष पत्रकार परिषद घेणार आहेत. ‘आम्ही खूप सहन केलं, बरबाद पण आम्हीच करणार आहोत. आता बघाच,’ अशा शब्दांत राऊतांनी भाजपला इशारा दिला. आश्चर्य म्हणजे या पत्रकार परिषदेला पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार उपस्थित असणार आहेत. यामुळे शिवसेना काेणता बाॅम्ब फोडणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे.

पक्षात एकाकी पडल्याने पत्रकार परिषदेचा घाट
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत ईडीच्या कोठडीत आहेत. राऊत यांच्या मुलीच्या लग्नातील ठेकेदारांची ईडी चौकशी करत आहे. स्वत: राऊत केंद्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर असल्याने पक्षात एकाकी पडले आहेत.

पत्रकार परिषदेपूर्वी प्रश्नांची उत्तरे द्या : भाजप
उद्या पत्रकार परिषद घेणार आहात, तर आजच्या प्रश्नांची उत्तरे का देत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषदेचा घाट घातला जातोय,” असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...