आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'राज'कारण:राज्यपालांना थेट भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान, राऊतांची राज ठाकरेंवर टीका; मनसेने फोटो शेअर करत म्हटले - 'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत'

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. वाढीव वीज बिल आणि दुध दराविषयीचा प्रश्न त्यांनी राज्यपालांसमोर मांडला. यावरुन संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हाच महाराष्ट्राचा अपमान असल्याचे राऊत म्हणाले होते. यावरुन मनसेने संजय राऊतांचा फोटो शेअर करत 'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत' असे शिर्षक देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊतांना राज ठाकरेंच्या राज्यपालांच्या भेटीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा ते म्हणाले होते की, 'महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांची भेट घेणे हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांची त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मनसेने आता यावर आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांचा एक फोटो ट्विट केला आहे. राऊतांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांची भेट घेतली होती. याच भेटीचा फोटा ट्विट केला आहे. तसेच फोटो ट्विट करुन 'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत' असं म्हणत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.