आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घडामोडी अनपेक्षित नाही:शरद पवारांनी राजकारणातून संन्यास घेतला नाही, ही कसलीही राजकीय खेळी नाही - संजय राऊत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षअध्यक्ष पदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवारांनी जाहीर केला आहे. पण त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला नाही. पवारांसारखा नेता समाजकारणातून कधीच निवृत्त होणार नाही. त्यांचा पदाचा राजीनामा ही कसलीही राजकीय खेळी नाही अशी स्पष्टोक्ती ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी दिली. ते आज माध्यमांशी बोलत होते.

राजकारणातून संन्यास घेतला नाही

संजय राऊत म्हणाले, माझ्या मते राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवारांनी जाहीर केला आहे. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला नाही अशी माझी माहिती आहे. शरद पवारांसारखा नेता समाजकारणातून कधीच निवृत्त होणार नाही. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांच्या या पक्षांतर्गत निर्णयावर शिवसेनेने भाष्य करणे योग्य नाही. पण ते शरद पवार असल्याने इतकेच सांगेल की, देशाला आणि राज्याला त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे.

घडामोडी अनपेक्षित नाही

संजय राऊत म्हणाले, एखाद्या पदावरुन निवृत्त होणे म्हणजे राजकारणातून निवृत्त होणे नाही. त्यांच्या पक्षात यासंदर्भात निर्णय सुरू आहे, काही निर्णय होतील. या घडामोडी अचानक घडल्या आणि खळबळजनक असल्या तरीही त्या अनपेक्षित काही नाही असे मला अलीकडच्या काही निर्णयावरुन वाटते.

बाळासाहेबांनीही राजीनामा दिला होता

संजय राऊत म्हणाले, शरद पवारांनी जो निर्णय घेतला तो का व कोणत्या परिस्थितीत घेतला याबाबत तेच सांगू शकतील. कार्यकर्ते, नेते अस्वस्थ झाल्याचे दिसते. काहीवर्षांपूर्वी 1990 दरम्यान शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. पक्षातील राजकारण, महाराष्ट्रातील काही घडामोडींचा त्यांना उबग आला होता. त्यातून त्यांनी राजीनामा दिला होता. पण लोकमतांचा आणि शिवसैनिकांचा रेटा एवढा अफाट होता की, त्यामुळे काही दिवसांनी त्यांना राजीनाम्याचा निर्णय परत घ्यावा लागला. एका विशिष्ट परिस्थितीत असे नेते निर्णय घेतात. शरद पवारांनी घेतलेला निर्णय तो त्यांचा आहे.

मविआला फरक पडणार नाही

संजय राऊत म्हणाले, आज त्यांच्याच पक्षाच्या बैठका सुरू आहे. त्यांचा पक्ष गोंधळलेला दिसतो. त्यांच्याच पक्षाचा आधारस्तंभ पदावरुन दुर होत आहे. अशावेळी इतर पक्षांनी जावून त्यांच्यात व्यत्यय आणणे योग्य नाही. आमचा एकमेकांशी संपर्क सुरू आहे. मविआवर काहीही फरक पडणार नाही. मविआचा आणि राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत निर्णयाचा संबंध नाही.

मिंधे शिंदे कुणी नाही

संजय राऊत म्हणाले, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे निर्विवाद अध्यक्ष म्हणून शरद पवारच धुरा सांभाळतात. जसा शिवसेना पक्ष ठाकरे या एका नावावर चालला आहे. कुणी शिंदे, मिंधे, गिंडे गेले कुठेही आणि निवडणुक आयोगाने त्यांच्या हातावर पक्ष ठेवला असला तरीही ठाकरे तिथे शिवसेना त्याचपद्धतीने जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी हे ठरलेले आहे.

पवारांना भेटून चर्चा करू

संजय राऊत म्हणाले, मला एवढेच म्हणायचे की, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या अंतर्गत घडामोडीवर मी भाष्य करणार नाही. फक्त शरद पवारांच्याच राजीनाम्याच्या मुद्द्यावर मी बोलेल. पक्षाला मी सल्ले देणार नाही. पण नक्कीच शरद पवार मोकळे असतील तेव्हा त्यांची भेट घेवू.

कुणालाच कुणकुण नव्हती

संजय राऊत म्हणाले, कार्यकर्त्यांच्या भावना मी पाहिल्या. नेता राजीनामा देतो तेव्हा काय अवस्था होते ते मला माहीत आहे. पण हे अत्यावश्यक असते. आज शरद पवारांच्या आत्मचरीत्राचे, पुस्तकाचे प्रकाशन होते. त्यांनी प्रवासाबद्दलचा दुसरा खंड प्रसिद्ध केला त्या कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणी राजीनाम्याची घोषणा केली. याची कुणाला कुणकुण होती का? माझ्या माहितीप्रमाणे ती कुणालाच नसावी. हे अनपेक्षित नाही एवढेच मी म्हणेल. आम्ही एकत्र आलो सरकार बनवणार होता. शब्दाला भाजप जागले नाही. त्यामुळे तीन पक्ष एकत्र येणारच होते. मला वाटत नाही ही खेळी असावी हा एक भावनिक खेळ आहे.

संजय राऊतांचे ट्वीट?

संजय राऊतांनी ट्वीट केले की, ''गलिच्छ राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांना कंटाळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे… मात्र शिवसैनिकांच्या प्रेमापोटी त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला…बाळासाहेबांप्रमाणेच पवारसाहेबही राज्याच्या राजकारणाचा आत्मा आहेत''