आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊत यांचे हक्कभंग नोटीसला लेखी उत्तर:म्हणाले - ''​​​​​​मी केलेले वक्तव्य तपासून पाहावे; ते विशिष्ट गटापुरते''

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाच्या हक्कभंग नोटिशीला उत्तर दिले. माझे वक्तव्य केवळ एका गटापुरते मर्यादीत आहे.'' असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले, मी तेव्हा उत्तर देऊ शकलो नाही. दोन दिवस विधीमंडळाला सुट्ट्या होत्या. त्यामुळे आज मी उत्तर दिले आहे. मी विधीमंडळाचा अपमान हक्कभंग होईल असे विधान केले नाही. "मी मुंबईच्या बाहेर असताना या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. हे वक्तव्य विधीमंडळातील सदस्यांचा अवमान करण्यासाठी मी केले नाही. ते एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे. हे कृपया लक्षात घ्यावे तरीही या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी.

दुखवण्याचा हेतू नव्हता

विधीमंडळाच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता आणि नसेल. मी केलेले वक्तव्य तुम्ही तपासू पाहावे असेही संजय राऊत यांनी म्हटले. त्यांनी याबाबत एक पत्र विधीमंडळाच्या प्रधान सचिवाच्या नावे दिले आहे.

संजय राऊत यांचे पत्र जसाश तसे..

प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,

जय महाराष्ट्र!

''कोल्हापुरातील एका कार्यक्रमात विधान मंडळाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत काही सदस्यांनी आक्षेप घेतला व विशेषाधिकार भंग व अवमानाची सूचना मांडली. याबाबत खुलासा करण्यासाठी आपण मला 3 मार्च 2023 पर्यंत सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत मुदत दिली.

  • मी आपणास नम्रपणे नमूद करू इच्छितो की, मी दि. 4 मार्चपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो व कर्नाटकच्या सीमेवरील भागात असल्याने मुंबईशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत खुलासा करणे शक्य झाले नाही. तरी कृपया सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी.
  • महाराष्ट्र विधान मंडळाचा व सदस्यांचा मी नेहमीच आदर करतो. प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे.
  • मी स्वतः अनेक वर्षे राज्यसभेचा सदस्य असल्याने मला अशा संसदीय मंडळांचे महत्त्व माहीत आहे. मी संपूर्ण विधान मंडळाबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे. हे कृपया लक्षात घ्यावे. तरीही या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी.
बातम्या आणखी आहेत...