आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपने महाविकास आघाडीच्या सभेवरुन जोरदार टीका केली होती. भाजप नेते आशिष शेलार यांनी 'मैदान छोटे, आकडे खोटे आणि राऊतांसारखे भोंगे फक्त मोठे', असे म्हणत 'मविआ'वर हल्लाबोल चढवला होता. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वज्रमूठ सभेनंतर खचाखच भरलेल्या मैदानाचा फोटो ट्विट करत भाजपच्या चिनी नजरेतून सगळ्यात लहान मैदानावरची लहान सभा पाहा, असा पलटवार केला आहे.
यापूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे मविआची वज्रमूठ सभा झाली होती. मात्र मुंबईत ज्या मैदानावर महाविकास आघााडीची ही सभा होत आहे. त्या मैदानावरुन भाजपने 'मविआ'ला टार्गेट केले. भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत वज्रमूठ सभेवर निशाणा साधला.
आशिष शेलार म्हणाले, जे मैदान ग्राहकोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनालाही कमी पडते, एकट्या भाजपाची सभा असते तेव्हा व्यवस्थेला जे मैदान वापरावे लागते अशा बीकेसीतील सर्वात छोट्यातील छोट्या मैदानात तीन पक्षांची सभा होत आहे. ही वज्रमुठ? असे म्हणत शेलारांनी खोचक सवाल उपस्थित केला होता.
हम सब एक है
आशिष शेलार यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. संजय राऊत म्हणाले, संजय राऊत म्हणाले, आशिष शेलारांचे डोळे चीनी आहेत. येऊन पाहा ही काय ताकद आहे. या सभेने निकाल दिला. मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसांची आमच्या बापांची आहे. काल देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊन गेले. आमची ताकद पाहा. निष्ठा पाहा आणि आमची वज्रमूठही पाहा. हम सब एक है और एक रहेंगे.
द्वेषाचा वडस
सभेनंतर संजय राऊत यांनी गर्दीने खचाखच भरलेल्या मैदानाचा फोटो ट्विट केला आहे. यात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, आजची वज्रमूठ सभा. 1 मे बीकेसी बांद्रे, भाजपच्या चिनी नजरेतून सगळ्यात लहान मैदानावरची लहान सभा. डोळ्यात महाराष्ट्र द्वेषाचा वडस वाढला असेल तर ऑपरेशन करून घ्या. हे तुफान थांबणार नाही, अशी टीका राऊतांनी केली.
संंबंधित वृत्त
भ्रष्टाचाराची जंत्री:ही दुर्बलांची भयभीत सभा, अमित शहांच्या भीतीने 3 पक्ष एकत्र आले; आशिष शेलारांची वज्रमूठ सभेवर टीका
महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा महाराष्ट्र दिनी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सवर पार पडलेल्या या सभेत उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले तिघांनीही राज्य सरकारवर सडकून टीका केली. महाविकास आघाडीच्या या सभेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी 'ही दुर्बळांची भयभीत सभा' असे म्हणत घणाघात केला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.