आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे विरुद्ध शिवसेना:भाजपने दिलेली स्क्रिप्ट वाचून राज ठाकरेंनी टाळ्या मिळवल्या, कालची सभा मनसेची नाही भाजपची, राऊतांकडून राज ठाकरेंवर टीका

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरेंच्या कालच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने दिली होती. ते वाचून राज ठाकरेंनी टाळ्या मिळवल्या, ज्या पवारांच्या पायाशी बसायचे त्यांनाच आज राज ठाकरेंनी जातीयवादी कसे ठरवले? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. यावेळी बोलताना अक्कल दाढ एवढी उशिरा कशी येते? याचा अभ्यास करावा लागेल. असा टोलाही राज ठाकरेंना लगावला आहे.

राज ठाकरेंनी काल गुढी पाडव्याच्या मेळाव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतले होते. याला आज शिवसेनेकडून उत्तर देण्यात आले आहे. भाजप आणि शिवसेना युतीवर राज ठाकरेंनी वक्तव्य केले होते. यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजप आणि आमच्यात काय झाले हे आम्ही पाहू. तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही आत यायची. तुम्ही तुमचे पाहा, असे सांगतानाच काल शिवाजी पार्कात भाजपचाच भोंगा वाजत होता. स्क्रिप्टही भाजपचीच होती आणि टाळ्या, घोषणाही भाजपच्याच स्पॉन्सर्ड होत्या, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेली कामे दिसली नाही का ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली विकासकामे राज ठाकरेंना दिसली नाही का? त्यावर राज ठाकरे काही बोलले का नाही? असा सवालही राऊत यांनी केला आहे.
काल मेट्रो आणि मराठी भाषा भवनाचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री काम करत आहे, एवढे मोठे ऐतिहासिक काम झाले, अहो त्याच्यावर बोला, असे राऊत म्हणाले.

काल भाजपची सभा होती ? राऊत

शिवाजी पार्कात भाजपचाच भोंगा सुरू होता, स्क्रिप्टदेखील भाजपकडून देण्यात आली होती. लोकांनाही वाटले कालची सभा भाजपची आहे. मदरशात धाडी हे केवळ टाळीचे वाक्य आहे, असे वाक्य अनेकदा ऐकेले आहे. भाजप सत्तेत असलेल्या किती राज्यात किती भोंगे हटवले ते सांगा? असे राऊत म्हणाले. तर तुम्हाला भोंग्याचे काय करायचे आहे, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.

आठवते का पवारांच्या पायाशी बसायचे ?
शरद पवार जातीयवाद पसरवता म्हणता आहात, पण तुम्ही याच पवारांच्या पायाशी बसून अनेक विषयांवर चर्चा करायचे, सल्लामसलत करत होते, याची आठवण संजय राऊतांनी यावेळी करून दिली. कशा करता आपण टोलेजंग माणसावर बोलायचे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही टोलेजंग माणसे आहेत. त्यांच्यावर कशाला बोलता अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...