आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊत-गांधी भेट:आप आणि तृणमूल काँग्रेस मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देत आहेत, राहुल गांधींनी राऊतांकडे बोलून दाखवली खंत

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही

उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी येथील हिंसाचारावरून देशात राजकारण पेटलेले आहे. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी नुकतीच काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीमध्ये राऊत आणि गांधी यांच्या काय चर्चा झाली याचा तपशील राऊतांनी सांगितला आहे. यावेळी राहुल गांधींनी संजय राऊतांकडे एक खंतही बोलून दाखवली आहे.

...लेकीन हम लढेंगे!
मंगळवारी दुपारी मी दिल्लीत श्री. राहुल गांधी यांना भेटलो. 12, तुघलक लेन हे त्यांचे निवासस्थान. श्री. राहुल गांधी लाल रंगाचे टी-शर्ट व पायजमा अशा साध्या वेशात गप्पा मारत होते. 'या लोकांनी देशात काय चालवले आहे पाहा.' अशी सुरुवात श्री. गांधी यांनी केली. यह लोक लोकतंत्र को पुरी तरह से खतम करने जा रहे है। लेकीन हम लढेंगे!' हे त्यांचे पुढचे विधान अधिक महत्त्वाचे. अशी संजय राऊत आणि राहुल गांधींच्या संभाषणाची सुरुवात झाली.

मला अटक झाली तरी हरकत नाही
'प्रियंका गांधी तुरुंगात होत्या व उत्तर प्रदेश सरकारने राहुल यांच्या या बहिणीस 36 तास बेकायदेशीरपणे डांबून ठेवले. आप चिंता मत करिये,' असे मी म्हणताच, 'हम जेल की चिंता नहीं करेंगे। प्रियंका में हिम्मत है। मी उद्याच लखनौला निघतोय. मला अटक झाली तरी हरकत नाही,' असे राहुल गांधी म्हणाले. असल्याचे राऊतांनी सांगितले.

भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही
उत्तर प्रदेशातील सर्वच राजकारणी हातचे राखून लढायला उतरले आहेत. प्रत्येकाचे हात कुठेतरी दगडाखाली अडकले आहेत. त्यामुळे 'खुलकर' कोणीच लढत नाही. श्री. गांधी यांचा रोख बहुधा मायावतींवर असावा. उत्तर प्रदेशसारखे मोठे राज्य जाती-धर्मात विभागले आहे. त्यामुळेच भाजपचा फायदा होतो, पण एक वेळ अशी येईल काँग्रेसच भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधी हे म्हणाले, तो दिवस लवकर उजाडो हीच अपेक्षा. असे राऊतांनी म्हटले आहे.

राऊत-गांधींमधील संभाषण

  • “पंजाबचा तिढा सुटला काय?" मी.
  • “नक्कीच. सगळे आमदार काँग्रेससोबतच आहेत. जुन्या व्यवस्थेवरच त्यांची नाराजी होती.” – गांधी.
  • "सिद्धूचे काय करणार?” मी.
  • "तेसुद्धा शांत होतील.” गांधी.

राहुल गांधींनी बोलून दाखवली खंत
आप आणि तृणमूल काँग्रेस मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देत आहेत. गोव्यात काही संबंध नसता तृणमूल व आप आली आणि त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले. पैशांचा वापर त्यासाठी सगळेच करतात ही खंत गांधींनी बोलून दाखवली. ती खरीच आहे. असे राऊतांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...