आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राऊतांना फडणवीसांची काळजी:देवेंद्र फडणवीस यांना वारंवार काळजी घेण्यास सांगतिले होते, मात्र त्यांनी ऐकले नाही : संजय राऊत

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवेंद्र फडणवीस बरे व्हावेत यासाठी तुळजाभवानीकडे प्रार्थना, सरकार त्यांची काळजी घेईल : राऊत

देवेंद्र फडणवीस यांना वारंवार काळजी घेण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी ऐकले नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत. कोरोनाची परिस्थिती किती गंभीर आहे हे आज त्यांना समजले असेल. असे राऊत म्हणाले. दरम्यान फडणवीस लवकर बरे व्हावेत यासाठी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो असे राऊत म्हणाले.

फडणवीसांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ते सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा चांगला निर्णय घेतला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयाला सूचना दिल्या आहेत. सरकार त्यांची काळजी घेणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

शिवतीर्थाऐवजी येथे होणार शिवसेनेचा दसरा मेळावा

कोरोनामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थाऐवजी सावरकर सभागृहात होत आहे. शिवतीर्थावर सोहळा झाला असता तर शिवसैनिकांचा महापूर दिसला असता असेही राऊत म्हणाले. मनाची आणि जनाचीही लाज आहे म्हणून दसरा मेळावा सभागृहात घेत आहोत. विरोधकांनी बिहारमध्ये जनाची आणि मनाचीही पाळली नाही. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मेळावा घेतला. भागवत आमच्यासाठी आदर्श, पण संघाच्या मेळाव्याबाबत विरोधक काय काय म्हणतील? असेही राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...