आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर ठाकरे सरकारचा बचाव:संजय राऊत राज्यसभेत म्हणाले - 'भाभीजी का पापड' खाल्ल्याने महाराष्ट्रात सर्वाधिक लोक बरे झाले नाहीत

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊत यांनी यावेळी केंद्र सरकारवर केली टीका

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 11 लाख पार झाली आहे. अशात शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी संसदेत केंद्र सरकारला फटकारले. संजय राऊत यांनी ठाकरे सरकारचा बचाव करत म्हटले की, महाराष्ट्रात सर्वाधिक संक्रमित रुग्ण असले तरी येथे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. हे सर्व रुग्ण 'भाभीजी के पापड' खाऊन बरे झाले नाहीत. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या कोरोना विषाणूच्या विषयावरील विधानावरील चर्चेदरम्यान राऊत बोलत होते.

राऊत यांनी धारावीचा उदाहरण देत म्हटले की, ते हे तथ्य यासाठी सांगत आहेत कारण यापूर्वी सभागृहातील खासदारांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली. संजय राऊत यांनी सांगितले की, त्यांची आई आणि भावाला देखील कोरोनाची लागण झाली होती. महाराष्ट्रात अनेक लोक कोरोनामुक्त होत आहेत. याशिवाय आज धारावीची स्थिति नियंत्रणात आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने देखील बीएमसीचे कौतुक केले होते. मी हे सर्व यासाठी सांगत आहे कारण काल ​​काही सदस्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती."

राऊत म्हणाले की, या संकटात देखील महाराष्ट्र सरकारची निंदा केली होती. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन झाले. अव्यवस्थेमुळे चेतन चौहान यांचा जीव गेल्याचे राज्यातील एका नेत्याने दावा केले होता असेही ते यावेळी म्हणाले.

संजय राऊत यांनी मेघवाल यांच्या वक्तव्यावर टीका केली

काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मेघवाल यांनी बिकानेरमधील भाभीजीच्या नावाचे पापडचा प्रचार करताना दिसून आले होते. या व्हिडिओत ते म्हणाले होते की, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी हे पापड प्रभावी ठरेल. सोबतच या पापडामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करेल असेही ते म्हणाले होते.

राऊत यांनी यावर निशाणा साधत म्हटले की, मला सदस्यांना विचारायचे आहे की कोरोनातून इतके लोक कसे बरे झाले? हे लोक भाभीजी चे पापड खाऊन बरे झालेत का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले की ही राजकीय नाही तर लोकांचे प्राण वाचवण्याची लढाई आहे.

महाराष्ट्रात11 लाख 21 हजार रुग्ण

राज्यात बुधवारी कोरोनाचे 23,365 नवीन रुग्ण आढळल्यानंतर एकूण रुग्णसंख्या 11 लाख 21 हजार 221 झाली आहे. राज्य आरोग्य विभागाने सांगितले की, कोरोनामुळे आतापर्यंत 474 आणखी लोकांचा मृत्यू झाला आहे. यासोबत एकूण मृतांची संख्या 30 हजार 883 झाली आहे. तर बुधवारी 17 हजार 559 लोकांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यासोबत एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 7 लाख 92 हजार 832 झाली आहे. आता राज्यात 2 लाख 97 हजार 125 लोकांवर उपचार सुरू आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser