आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीबीआय कारवाईवर वार अन् पलटवार:मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे कोणीही तिला बघत नाही असे होत नाही, संजय राऊतांनी रोज उठून आम्हाला प्रवचन देऊ नये; चंद्रकांत पाटलांचा टोला

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राउतांवरही महिलेने आरोप केलेले आहेत, महिला आयोगाकडून चौकशी व्हावी -भाजप

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांनंतर पासून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान संजय राऊत हे नेहमीच विरोधी पक्षाला त्यांच्या शैलीमध्ये उत्तरे देत असतात. यावरुन आता चंद्रकांत पाटलांनी राऊतांना खोचक टोला लगावला आहे. संजय राऊतांनी रोज उठून आम्हाला भाषण आणि प्रवचन देऊ नये असे म्हटले आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हा टोला लगावला आहे.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने आरोप केलेले आहेत. या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणीही पाटलांनी केली. तसेच राऊतांचे रोज उठून नाटक चाललेय. मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे कोणीही तिला बघत नाही असे तिला वाटत असते आणि हाच प्रकार संजय राऊत यांना लागू पडतो असेही पाटील म्हणाले.

संजय राऊत हे सातत्याने विरोधकांवर निशाणा साधत असतात. आज सामना अग्रलेखामध्ये शिवसेनेने केंद्र सरकारवर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्रावर ताशेरे ओढल्यामुळे राऊतांनी टीका केली. यावरुनच बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'संजय राऊत यांनी रोज उठून आम्हाला भाषण, प्रवचन देऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले तर संजय राऊतांकडून लगेच टीका केली जात. हेच उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्याबाबतीत केले तर आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते सांगतात. हा दुटप्पीपणा चालणार नाही' असेच पाटलांनी राऊतांना सुनावले.

बातम्या आणखी आहेत...