आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई ही महाराष्ट्राला मिळाली ती मराठी माणसांच्या रक्तामुळे आणि घामामुळे, यात सर्व जण राहतात. मात्र, भाजपची विचारसरणी ही केवळ पैश्याच्या मागे धावणारी आहे. पैशे वाले म्हणजे राज्य अशी त्यांची संकल्पना आहे. असे म्हणताना त्यांनी नाना शंकरशेठ यांनी मुंबई श्रीमंत केली ते मराठी होते, त्यांचे चरित्र आम्ही राज्यपालांना पाठवणार आहोत असे संजय राऊत यांनी सांगितले.
मराठी माणसांला पैसे कमवू देत नाही
राज्यपाल अश्या प्रकारची विधाने सातत्याने करत असतात, त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्द्ल विधान केले तेव्हाही भाजपचे लोक गप्प बसले असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. तर गुजराती आणि राजस्थानी बांधव नसले तर आम्ही काय भिकारी आहे का? आम्ही मुंबई आणि ठाणेंच्या जडणघडीति काहीच केले नाही का असा संतप्त सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. श्रम करणाऱ्या मराठी माणसांविषयी तुम्हाला इतका द्वेष् का असा सवालही त्यांनही विचारला आहे. मराठी माणसांने पैसा कमावला तर केंद्रीय यंत्रणाकडून त्यांची गळचेपी करते असेही त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला नाही. हा हिंदुत्वाचा अपमान नाही का असा सवाल राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
राज्यपालांच्या मुंबई बद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी 4 ट्विट करत भाजपची कानउघडनी केली आहे. महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला.स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे. थोडा जरी अभिमान असेल तरी राज्यपालांचा राजीनामा घ्या, नाहीतर शिवसेनेचे नावही घेऊ नका असा हल्ला खासदार संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे.
मराठी माणसाला आवाहन
आता तरी, ऊठ मराठ्या ऊठ, शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजप राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत. मराठ्या तुलाच उठावे लागेल. असा टोला त्यांनी शिवसेनेतून एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या खासदार, आमदारांच्या गटाला लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र वेगळा?
थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे. 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता.मुख्यमंत्री शिंदे ऐकताय ना, की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा. दिल्ली पुढे किती झुकताय? असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला आहे.
झाडीवाले कुठे लपले?
काय ती झाडी, काय तो डोंगर, काय नदी, आणि आता काय हा मराठी माणूस, महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.