आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढीपाडवा:विरोधकांची गुढी कितीही उंच गेली, तरी शिवसेनेची गुढी महाराष्ट्रावर सदैव फडकतच राहील; संजय राऊतांचे वक्तव्य

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी नववर्ष प्रारंभ आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. गुढी हा पवित्र, संस्कार, संस्कृती, धर्म यासंदर्भातील विषय आहे. त्यामुळं गुढी कोणाची पाडायची नसते, त्यांच्यापेक्षा आपली गुढी कशी उंच होईल हे पाहायचे असते. शिवसेनेची गुढी भगव्या झेंड्याची आहे. आमचं हिंदूत्व आहे ते कायम आहे. शिवसेनेची गुढी महाराष्ट्रावर सदैव फडकतच राहील. महाराष्ट्राच्या बाहेरही फडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपली गुढी इतरांपेक्षा उंच कशी राहील, यासाठी प्रयत्न करेन, असे राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातील कोरोनाचे निर्बंध हटवून सरकारने, मुख्यमंत्र्यांनी आणि आरोग्यमंत्र्यांनी जनतेला पाडवा भेट दिली आहे. तसेच मराठा तेतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे, असे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले.

याशिवाय, भाजपामध्ये खूप साखरेच्या गाठी असून आमचं आख्खं गुळाचं पोतच तिथे आहे. तिथले सगळेच, मोदी, शाह, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार हे सर्व जण आमच्या जवळचे आहेत. भांडण हे नेहमी विचारांचे असले पाहिजे. व्यक्तिगत शत्रुत्वाने तुम्ही राजकीय भांडणं करायला लागलात, तर महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेला धक्का बसेल. अगदी यशवंतराव चव्हाण ते बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांपर्यंत कधीही सुडाचे राजकारण केल्याचे आठवत नाही. आमच्यावर ते संस्कार असल्याचे संजय राऊत म्हणाले.

मौनाबाबतच्या टि्वटवर संजय राऊतांचं स्पष्टीकरण -
कधी-कधी मौन हेच सर्वांत चांगले उत्तर असते, असे ट्वीट करत संजय राऊत यांनी यापुढे आपलं उत्तर मौन स्वरूपात असेल, असे संकेत दिले होते. त्याच्यावर आज त्यांनी स्पष्टीकरण दिलं. 'मी त्या दिवसापुरते बोलायचे नाही असे ठरवले होते. पण मी जर बोललो नाही, तर अनेक विरोधकांची राजकीय दुकानं बंद होतील, असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला.

बातम्या आणखी आहेत...