आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअजित पवारांविषयीच्या निर्माण केलेल्या अफवांना पूर्णविराम दिला पाहिजे. पवार कुटुंबात एक नाते आहे. पण राजकारण वेगळे असते. राजकारणात कधी काय घडेल, हे सांगता येत नाही. आज राष्ट्रवादीत आम्ही असंतोष पाहतोय, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज हे वक्तव्य केले आहे. राऊतांनी अजित पवारांबाबत केलेल्या या सूचक विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकच हल्लाकल्लोळ माजला. मात्र शरद पवार अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहेत. शरद पवारांनंतर कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अजितदादा कि सुप्रियाताई? राजकीय क्षेत्रातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. या राजकीय कोलाहलात आता संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेने वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवीन अध्यक्षाचे स्वागत
संजय राऊत म्हणाले, राजकारण वेगळे असते. राजकारणात कधी काय घडेल, हे सांगता येत नाही. शिवसेनेत असंतोष असल्याचा उल्लेख शरद पवारांनी आपल्या पुस्तकात केला आहे. यावर राऊत म्हणाले, शिवसेनेच्या असंतोषाविषयी माहित नाही मात्र राष्ट्रवादीत असंतोष दिसत आहे. अध्यक्षपद कोणाला द्यावे हा सर्वस्वी त्या पक्षाचा निर्णय आहे. नवीन अध्यक्षाचे स्वागत करणे हे आपले काम आहे.
मुंबईला केंद्रशासित करण्याचा डाव
संजय राऊत म्हणाले, काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी मुंबईचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव. मुंबईला केंद्रशासित करण्याचा डाव आहे. शरद पवारांच्या पुस्ताकाविषयी लवकरच उद्धव ठाकरे मुलाखत देणार आहेत. त्यात ते याविषयी भूमिका स्पष्ट करतील. केंद्र शासनाच्या सूचना होत्या म्हणून उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नव्हते. त्यामुळे या आरोपात तथ्य नाही. वज्रमूठ सैल होणार नाही.
बाहेर चर्चा सुरू आहेत
अजित पवार किंवा त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडविण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले काय? अशी चर्चा बाहेर आहे. अजित पवार यांच्या विषयी अफवांना पूर्णविराम दिला पाहिजे. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधी ही या देशातली टोलेजंग व्यक्तीमत्व आहेत. त्यांचे वारसदार म्हणून त्यांच्या घरातून जेव्हा कुणी पुढे येते तेव्हा त्यांना ती उंची गाठता येत नाही. कारण ते एवढे महान व्यक्तीमत्व असतात. आपण त्यांची तुलना त्यांच्या वडिलांशी करतो हे चुकीचे आहे. उद्धव ठाकरेंची बाळासाहेब ठाकरेंशी तुलना होऊच शकत नाही.
संबंधित वृत्त
राजकारण:अजित पवार घोटाळेबाज, वेगवेगळ्या गुन्ह्यांत अडकलेले नेते, त्यांना अध्यक्षपद देणे चूक ठरेल -शालिनीताई पाटील
अजित पवार घोटाळेबाज आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांत अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देणे चुकीचे ठरेल, असा दावा महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करताना केला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.