आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे मुले विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापे मारेल होते. या कारवाईचे भाजपकडून समर्थन तर शिवसेनेकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक व्यंगचित्र पोस्ट करत ईटी आणि सीबीआय या यंत्रणांवर टीका केली. तसेच अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे.
व्यंगचित्राबाबत काय म्हणाले संजय राऊत?
हे व्यंगचित्र ज्यांना समजले, ते त्या भावनेने घेतील, ज्यांना ते समजलेले नाही, ते अधिक सूड भावनेने वागतील, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
काय आहे व्यंगचित्रात ?
संजय राऊत यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दोन कुत्रे दिसत आहेत. यातील एका कुत्र्याला सीबीआय, तर दुसऱ्या कुत्र्याला ईडी असे संबोधले आहे. तसेच एक कुत्रा दुसऱ्याला ''रुक! अभी तय नही है, किसके घर जाना है…'' असे म्हणताना दाखवले आहे. विशेष म्हणजे या फोटोच्या उजव्या कोपऱ्यात महाराष्ट्र असे लिहिले आहे. संजय राऊतांच्या या फोटोवर हजारो नेटकऱ्यांनी लाईक केले आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2020
काय आहे प्रकरण?
ईडीने मंगळवारी (24नोव्हेंबर) प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर धाड टाकली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान या छापेमारीवेळी प्रताप सरनाईक देशाबाहेर होते. मात्र ईडीने धाड टाकल्याचे समजताच ते मुंबई परतले आणि तडक शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.