आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल देशमुखांना अटक:केंद्र सरकारनेच परमबीर सिंग यांना देशाबाहेर जाण्यास मदत केली, अनिल देशमुखांची अटक दुर्दैवी; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने कारवाई सुरु केली आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील काल रात्री उशिरा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने अटक केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला दोन मोठे झटके लागले आहे. त्या पार्श्वभुमीवर आता खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, 'अनिल देशमुख यांची झालेली अटक ही दुर्दैवी आहे. ही अटक कायदा आणि नितीमत्तेला धरून नाही. देशमुख यांच्यावर आरोप करणारे लोग पळून गेले नसून, त्यांना पळून लावलेले आहे. कुणीही देशाबाहेर पळून जातो तो केंद्रीय सत्तेच्या मदतीनेच पळून जाऊ शकतो. महासंचालक दर्जाचा अधिकारी जेंव्हा हा देश सोडून जातो तेव्हा केंद्राचा पाठिंबा असल्याशिवाय पळवून जाऊ शकत नाही.

त्याने केलेल्या आरोपानुसार केंद्रीय तपास यंत्रणा अटक करते. चौकशी तपास होऊ शकतो मात्र, पहिल्याच भेटीत देशमुखांना अटक करणे चुकीचे आहे. त्यांना मुद्दामून त्रास दिला जात आहे.' असे मत राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडले.

भाजपचे लोक जंगलात राहतात

भाजपचे लोक जंगलात राहतात का? त्यांच्या काहीच प्रॉपर्टी नाहीयेत का, त्यांचे सगळे वैध मार्गाने आहे का? आम्हीही केंद्रीय यंत्रणांना अनेकवेळा माहिती दिली आहे.

मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाहीये. त्यांची बायकापोरं म्हणजे कुटुंब आणि आमची रस्त्यावर राहातात का? हे घाणेरडे राजकारण त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही आणि आज टणाटण उड्या मारणाऱ्यांना उद्या तोंड लपवावे लागेल, असे म्हणत राऊतांनी भाजपवर टीकास्त्र केले.

दिवाळी नंतर असे करु तसे करु, म्हणणारे हे लोक घरात बाथरुममध्ये तोंड लपवून बसतील, असे गौप्यस्फोट दिवाळीनतंर होतील. हे सगळे राजकीय षड्यंत्र आहे जे मी सुद्धा भोगलेय. ज्यांच्यामुळे भाजप सरकार सत्तेवर आले नाही त्या सगळ्यांना त्रास दिला जातोय. जे बळी पडत नाहीत त्यांना त्रास दिला जातोय. मात्र कितीही त्रास दिला तरी त्यांचे सरकार सत्तेत येणार नाही, असाही दावास राऊत यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...