आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना नेते संजय राऊत उद्या अयोध्येत:आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी जोरात, रामनगरीत जाऊन घेणार आढावा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते संजय राऊत उद्या अयोध्येत जाणार आहेत. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याआधी संजय राऊतांचा हा आढावा दौरा असणार आहे. देशाच्या राजकारणात आता अयोध्येला विशेष स्थान मिळू लागले आहे. साधारण सर्व राजकीय नेते आता अयोध्येचा दौरा करू लागले आहेत.

इस्कॉन मंदिराला देणार भेट

आदित्य ठाकरे येत्या 15 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील त्यांच्या सोबत असणार आहेत. आदित्य ठाकरे हे रामलल्लांचे दर्शन घेतील. तसेच इस्कॉनच्याही मंदिराला भेट देतील, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा राजकीय नसेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. आदित्य ठाकरेंचा दौरा राजकीय नसून, आम्ही प्रभू श्रीरामांवरील श्रद्धा आणि भक्तीपोटी अयोध्येत जात आहोत, असेही राऊतांनी यावेळी बोलताना सांगितले होते.

खासदारही राहणार उपस्थित

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. आता 15 जूनला आदित्य ठाकरे पक्षाच्या खासदारासंह अयोध्येचा दौरा करणार आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...