आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (ता.१५) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीकेचे बाण सोडले. यावेळी त्यांनी भाजप नेता मोहित कंबोज हाच फडणवीसांचा फ्रंट मॅन असल्याची टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना कंबोज यांनी राऊत अडचणीच्या काळात आपल्याकडून पैसे घ्यायचे व त्यांचे स्मगलरांशीही संबंध असल्याचा खळबळजनक दावा पत्रकार परिषदेत केला.
कंबोज म्हणाले की, ‘मागील पाच महिन्यांपासून महाराष्ट्राचे संपूर्ण शासन आणि प्रशासन माझ्यासारख्या ३७ वर्षीय मुलाशी लढून जिंकू शकलेले नाही. दरराेज माझ्यावर खोटे आरोप करणे, ट्विटर आणि इतर माध्यमातून माझ्यावर दबाव निर्माण करणे हे सध्या सुरू आहे. पण, नवाब मलिक जसे तोंडावर पडले तसेच राऊतसुद्धा तोंडावर पडतील, असा दावा त्यांनी केला. कंबोज याला आपण ओळखत नाही, असे संजय राऊत मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हणाले हाेतेे. मात्र राऊत हे आपल्या घरी आल्याचा फोटोच कंबोज यांनी यावेळी पत्रकारांना दाखवला. ‘राऊत हे दरवर्षी माझ्या घरी गणपतीसाठी येतात. फक्त येतच नाहीत तर, त्यांना आतापर्यंत आयुष्यात जेव्हा कधी आर्थिक अडचण आली तेव्हा त्यांनी माझ्याकडे मदतदेखील मागितली आहे आणि मी मैत्रीखातर त्यांना मदत देखील केली आहे,’असा दावा कंबोज यांनी केला.
‘त्यामुळे राऊत मला ओळखतच नाही असे म्हणत असतील तर त्यांचा स्मृतिभ्रंश झाला आहे. गजनीच्या कॅरेक्टरशी त्यांचे कॅरेक्टर आता जुळू लागले आहे.’ असा टोला कंबोज यांनी लगावला. मी देवेंद्र फडणवीसांचा ‘ब्ल्यू आईज बॉय’ आहे, असे राऊत आज म्हणाले आहेत. पण, मला हे सांगायला अजिबात लाज वाटत नसून माझ्यासाठी ती गर्वाची बाब असल्याचे कंबोज म्हणाले.
तुमचे इमान कुठे ?
आमचे इमान एक व्यक्ती आणि पक्षासोबत आहे. पण तुमचे इमान कोणाकडे आहे? आपण उद्धव ठाकरेंचे ब्ल्यू आईज बॉय आहात की, शरद पवारांचे? असा सवाल कंबोज यांनी संजय राऊत यांना केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.