आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविरोधकांना नेस्तनाबुत करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनाही अडचणीत आणम्याचे घाणेरडे राजकारण राज्यात देवेंद्र फडणवीसांनी सुरू केले. केंद्रात मोदी आणि शहांनी असे राजकारण सुरू केले, अशी घणाघाती टीका आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
तसेच, तुमचेही कुटुंब तुरुंगात जाईल, असे पुरावे आमच्याकडे आहेत. तोंड उघडायला लावू नका. अन्यथा महाराष्ट्रात स्फोट होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
देवेंद्र फडणवीसांनी कटुता आणली
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, राजकारणात कुणाच्याही कुटुंबापर्यंत पोहोचायचे नाही, अशी शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिली आहे. त्यामुळे आम्ही असे घाणेरडे, दळभर्दी राजकारण कधीच केले नाही. मविआतील घटक पक्षांनीही असे राजकारण केले नाही. मात्र, राज्यात ही कटुता देवेंद्र फडणीसांनी आणली.
राजकारणात कुणाचेही कुटुंब आणू नका
संजय राऊत म्हणाले, आजही एकनाथ खडसेंचे जावई तुरुंगात आहेत. नवाब मलिक यांच्यासह अनेक विरोधकांच्या कुटुंबीयांनाही अडचणीत आणले जात आहेत. भाजप नेत्यांनी आरोप केले की लगेच कारवाई होते. विरोधकांनी पुरावे दिले तरी कारवाई होत नाही. कालपर्यंत आम्ही भाजप नेत्यांवर जे आरोप केले आहेत, त्याचे सर्व पुरावे जाहीर केले आहेत. तरीही भाजप नेत्यांना क्लिन चीट दिली जाते व विरोधकांच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य केले जाते. आमच्याकडेही तुमचे कुटुंब तुरुंगात जाईल, असे पुरावे आहेत. तोंड उघडायला लावू नका. अन्यथा महाराष्ट्रात स्फोट होईल. राजकारणात कुणाचेही कुटुंब आणू नका.
एका जागेसाठी युती तोडली होती
दरम्यान, विधानसभेसाठी भाजपने शिंदे गटाला 40 ते 45 जागा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. यावर संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाची लायकीच हीच आहे. शिवसेनेने एका जागेसाठी भाजपसोबत युती तोडली होती. हा शिवसेनेचा स्वाभिमान होता. आता भाजप जे तुकडे फेकेल ते शिंदे गटाला आयुष्यभर चघळावे लागतील. पुढील निवडणुकीत भाजप 40 काय 5 जागाही शिंदे गटाच्या तोंडावर फेकणार नाही. भाजपला शिवसेनेचा रुबाब, दरारा नष्ट करायचा होता. त्यामुळेच भाजपने शिवसेना तोडली व फेकलेल्या तुकड्यावर जगणारे निर्माण केले.
संबंधित वृत्त
ठाकरे गटाची बसवराज बोम्मईंवर टीका: सीमावासीयांचा आरोग्य निधी रोखण्याची घोषणा म्हणजे मानसिक आरोग्य बिघडल्याचे लक्षण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमा भागातील जनतेसाठी 54 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मात्र, हा निधी रोखण्याची दर्पोक्ती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. यावर सीमावासीयांचा आरोग्य निधी रोखण्याची घोषणा करणे म्हणजे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. बोम्मईंचे मानसिक आरोग्य बिघडल्याचे हे लक्षण आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.