आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती शिवाजी महाराज माफीवीर होते का?:संजय राऊत यांचा भाजपला सवाल; शिंदे गटाची टोळी गँगवॉरमध्ये मारली जाणार!

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज हे माफीवीर होते का? छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातले जुने-पुराणे नेते होते. आता त्यांचे महत्त्व नाही. राज्यपालांचे हे विधान भाजपला मान्य आहे का? असा सवाल मंगळवारी खासदार संजय राऊत यांनी केला.

शिंदे गट टोळी आहे. त्यामुळे त्यांना निवडणुकीत एकही जागा नको आहे. अशा टोळ्या गँगवॉरमध्ये मारल्या जातात, असा पलटवार त्यांनी केला.

राज्यपालांना हटवावे

खासदार संजय राऊत यांनी आज भाजपवर सडकून टीका केली. राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा सगळ्यात मोठा अपमान आहे. या देशाचे युगपुरुष, महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होतो आणि तिथेच संपतो. इतर राज्यांना भूगोल आहे. महाराष्ट्राला इतिहास आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून इथे इतिहास आहे. हा इतिहास महाराष्ट्राच्या राज्यपालांना मान्य नसेल, भाजपच्या मंत्र्यांना मान्य नाही. त्याच्यावरती महाराष्ट्राने त्यांच्या माफीची आणि राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. त्याच्यावर भारतीय जनता पक्षाने आधी आपले मत व्यक्त करावे.

हे बरे नव्हे

संजय राऊत म्हणाले, राज्यपालांनी शिवरायांसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत गप्प बसायचे आणि दुसऱ्या विषयाकडे वळायचे हे चांगले लक्षण नाही. सुरुवात करायची असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानाचा विषय अर्धवट सोडता येणार नाही. तो अजून जिवंत आहे. त्याच्यावरून लक्ष तुम्ही बाजूला वळवू शकत नाही. औरंगाबादचे संभाजीनगर हे नामकरण महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे आता कोणी काय म्हणते त्याला महत्त्व नाही.

उद्योग पळवल्याने बेकारी

संजय राऊत म्हणाले, सरकार एका वर्षात दोन कोटी रोजगार देऊ म्हणते. महाराष्ट्रात सर्वात जास्त बेरोजगारी वाढली आहे. कारण मुंबईसह महाराष्ट्रातले अनेक मोठे उद्योग दुसऱ्या राज्यात पळवले. गुजरातमध्ये पळवले. विदर्भातून पळवले. जे उद्योग एका वेळेला दीड-दीड, दोन-दोन लाख रोजगार देऊ शकत होते, असे वेदांतासारखे व इतर उद्योग हे गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने तिथे पळवले. त्यामुळे बेरोजगारी फटका सर्वात जास्त महाराष्ट्राला बसतो आहे.

मिंधे झाले मांडलिक

गुलाबराव पाटील यांनी आम्हाला विधानसभेची एकही जागा नको असे म्हटले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले,असे लोक मिंधे असतात. मांडलिक असतात. त्यांना स्वतःचे अस्तित्वच नसते. ते समर्पित झालेत. भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झालेत. त्यांच्यातला शिवसैनिक मेलेला आहे. स्वाभिमान संपलेला आहे. ते आता त्यांचा गट भाजपमध्ये विलीन करत आहेत म्हणून त्यांना एकही जागा नको आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रासाठी आणि हिंदुत्वासाठी यापुढेही लढत राहू आणि संघर्ष करू.

टोळीला अस्तित्व नसते

शिंदे यांचा एक गट आहे. टोळी आहे. टोळीला अस्तित्व नसते. ती गँगवॉरमध्ये मारली जाते. किंवा पोलिस इन्काउंटरमध्ये मारली जाते. हा मला मुंबईतल्या गँगवॉरचा इतिहास माहिती आहे. टोळ्या नष्ट होतात. त्यांचे अस्तित्व रहात नाही. ते स्वतःला टोळी मानत असतील, तर त्यांचे म्हणणे बरोबर आहे. आम्हाला एकही जागा नको. जितके दिवस आहेत तितके दिवस खंडण्यावगैरे गोळ्या करायच्या. त्यानंतर परदेशात पळायचे. असे गँगस्टर करत असतात, असा टोला त्यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...