आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासदार संजय राऊत यांना तातडीने अटक करावी. त्यांनी हिंमत असेल तर सुरक्षा नाकारुन फिरून दाखवावे, असे आव्हान शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी दिले आहे. आमची मते घेऊन संजय राऊत खासदार झाले आहेत, त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा असेही गोगावले यांनी म्हटले आहे.
दरम्यान विधीमंडळाच्या पायऱ्यावर सत्ताधारी आमदारांकडून संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. यानंतर सत्ताधाऱ्यांनी राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
भरत गोगावले म्हणाले की, संजय राऊत यांनी विधीमंडळातील सदस्याबाबत वक्तव्य केले आहे. अध्यक्षांच्या दोन दिवसांचा निर्णय आम्हाला मान्य नाही, राऊत यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी गोगावले यांनी केली आहे. चोर आम्ही आहे की संजय राऊत आहे, हे आम्हाला सिद्ध करायचे आहे. संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर खासदाराकीचा राजीनामा द्यावा असे गोगावले यांनी म्हटले आहे.
भरत गोगावले यापुढे बोलताना म्हणाले की, संजय राऊत यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी सुरक्षा नाकारून पुढे यावे, मग बघू हा खरा शिवसैनिक आहे का खोटा आहे, असे आव्हान राऊतांना दिले आहे. विरोधकांची सुद्धा मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई व्हावी असेही त्यांनी म्हटले आहे. सुनील प्रभू यांनी सभागृहात बोलायची संधी मिळालीच नाही, त्यामुळे ते जर चोर असतील तर त्यांनी संजय राऊतांचे समर्थन करावे असा टोला गोगावले यांनी सुनील प्रभुंना लगावला आहे. भरत गोगावले यापुढे बोलताना म्हणाले की, आमच्या 40 आमदारांचया मतावर निवडून आलेल्या संजय राऊत यांनी राजीनामा द्यायला हवा.
आमदार संतोष बांगर म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने आमदारांना निवडून दिले आहे. संजय राऊत यांच्यामते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांचे भाऊ देखील चोर आहेत. असे वक्तव्य करणाऱ्या वक्तीची सुरक्षा 10 मिनिटे काढायला हवी, मग महाराष्ट्रातील जनता ठेचल्याशिवाय राहणार नाही. माफीमागून काम होणार नाही त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी बांगर यांच्यासह आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
फडणवीसांचा संतप्त सवाल
संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात निषेध नोंदवला. संजय राऊत आम्हाला चोर मंडळ म्हणत आहेत. उद्धव ठाकरे हे याच सभागृहाचे सदस्य आहेत. मग आम्ही सर्वच चोर ठरतोय काय? असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना विचारला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.