आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचा घणाघात:केंद्राच्या दबावापुढे झुकणार नाही, कायदेशिर मार्गाने ज्यांच्या कॉलरला हात घालायचा तो घालणारच, संजय राऊतांचा भाजपला इशारा

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप महाराष्ट्रात अतिरेक्यांप्रमाणे कारवाया करीत आहे. राज्यातील काही कारवायांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे. पण केंद्राच्या दबावापुढे झुकणार नाही. मुख्यमंत्रीपद भाजपला हवे होते म्हणून त्यांनी युती तोडली. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदेशिर मार्गाने ज्यांच्या कॉलरला हात घालायचा तो आम्ही घालणार आहोतच असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला.

राऊत माध्यमांशी आज बोलत होते. एक महिना उलटला तरीही प्रधानमंत्री कार्यालयाला दिलेल्या कागदपत्रांवर अजून कारवाई झाली नाही असा प्रश्न संजय राऊत यांना विचारल्यानंतर त्यांनी यावर सविस्तर उत्तर दिले. प्रधानमंत्री कार्यालयाला पुराव्यासह आम्ही कागदपत्रे पुरविली. भ्रष्ट्राचारमुक्त कामकाजाचा दावा प्रधानमंत्री कार्यालय करते, अर्थातच आता मी त्यांच्या कारवाईची वाट पाहत आहे. आम्ही महाराष्ट्रातील तपास यंत्रणांनाही कागदपत्रे दिली आहेत. त्याबाबत लवकरच कारवाई होताना दिसेल असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

केंद्रावर निशाणा साधताना ते म्हणाले की, पाच राज्याच्या निवडणूका झाल्या पण भाजप सरकारने जनतेला एप्रिल फुल केले आहे.

शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरपराधाला शिक्षा होऊ नये हे संविधानाचे ब्रिद त्यानुसारच आम्ही वागतो असे सांगतानाच त्यांनी केंद्राच्या दबावापुढे आम्ही झुकणार नाही असे सांगत एकप्रकारे आव्हानही दिले आहे.

मुख्यमंत्री नाराज ही अफवा

मुख्यमंत्री नाराज असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, ही केवळ अफवा आहे ती विरोधकांनी पसरवली. आमचे तीन पक्षांचे सरकार आहे. जी खाती ज्यांच्या वाट्याला आली त्या खात्याची जबाबदारी त्यांनी योग्य व चोखरित्या पार पाडावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्रीपद आमच्याकडे आहे व सर्व खात्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्याकडेच आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...