आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी मुंबईचे टॉप क्राइम रिपोर्टर होते संजय राऊत:दाऊद इब्राहिमला फटकारले, वयाच्या 29 व्या वर्षी झाले 'सामना'चे संपादक

मुंबई |आशिष राय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. काल दिवसभर चौकशी केल्यानंतर ईडीने अखेर रात्री त्यांना अटक केली. अटक करण्यापूर्वी ईडीच्या तीन पथकाने त्यांच्या घरावर छापा मारला होता. राऊत यांना त्यांचे निवासस्थान 'मैत्री' येथून ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. सुमारे 8 तास चौकशीनंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. संजय राऊत हे राजकारणातील मोठे नाव असले तरी, ते 80 च्या दशकात मुंबईत क्राईम रिपोर्टिंग करायचे.

संजय राऊत यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात लोकप्रभा पत्रिका या दैनिकापासून केली. त्यांना अंडरवर्ल्ड रिपोर्टिंगमध्ये तज्ञ मानले जात होते. दाऊद इब्राहिम, छोटा राजन आणि अंडरवर्ल्डवर केलेली रिपोर्टिंग चांगलीच गाजली होती. रिपोर्टिंगच्या क्षेत्रात त्यांचे नाव पुढे येत गेले आणि त्यानंतर ते बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेत आले. त्यानंतर राऊत यांचे मातोश्रीवर येणे-जाणे वाढले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी सामनाच्या संपादकाची जबाबदारी राऊतांकडे सोपवली. त्यावेळी ते 29 वर्षांचे होते. तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजेच गेली 30 वर्षांपासून ते सामनाच्या संपादक पदावर रुजू आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या जवळ आले. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले, तेव्हापासून त्यांना शिवसेनेचा ‘थिंक टँक’ म्हटले जात आहे.

दाऊद इब्राहिमला फटकारले

क्राईम रिपोर्टर असूनही ते कधीही पोलिस चौकीत गेले नाहीत आणि कोणत्याही बातम्यांबाबत पोलिस अधिकाऱ्यांना भेटले नाहीत, असे राऊत यांच्याबद्दल बोलले जाते. क्राईम रिपोर्टिंग करणाऱ्या राऊतच्या बातम्यांचा सूत्रधार दाऊद असायचा. संजय राऊत यांना बातम्या देण्यासाठी दाऊद इब्राहिम अनेकदा एक्सप्रेस टॉवरवर यायचा, अशीही चर्चा आहे. दोघे इथल्या कॅन्टीनमध्ये बसून गप्पा मारत असे. 1993 च्या बॉम्बस्फोटात त्याचे नाव येण्याआधी अनेक वर्षे दाऊत आणि राऊत हे एकमेकांच्या संपर्कात होते. 16 जानेवारी 2020 रोजी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी स्वतः दाऊद इब्राहिमला भेटल्याची कबुली दिली होती. ते म्हणाले होती की, 'मी दाऊद इब्राहिमला पाहिले होते, मी त्याच्याशी बोललोही आहे. मी त्याला एकदा फटकारले देखील आहे.'

बाळासाहेबांचा आवाज बनले

सामनामध्ये संपादक झाल्यानंतर संजय राऊत यांनी वृत्तपत्रात अनेक मोठे बदल केले. शिवसेनेच्या विचारसरणीशी निगडीत अशा गोष्टी संपादकीयातून येऊ लागल्या आणि हळूहळू हे वृत्तपत्र बाळासाहेब ठाकरेंचा आवाज बनले. हे संपादकीय बाळ ठाकरे यांच्या शैलीत लिहिले आहे. राऊत संपादकीय लिहीत असत, पण ते वाचून लोकांना समजले की ते बाळासाहेब ठाकरे लिहित आहेत. सामनामध्ये हा प्रयोग खूप गाजला आणि आजही वृत्तपत्रातील संपादकीय ही शिवसेनेची अधिकृत आवृत्ती मानली जाते.

संजय राऊत हे शिवसेना आणि इतर पक्षांमधील दुवा मानले जातात.
संजय राऊत हे शिवसेना आणि इतर पक्षांमधील दुवा मानले जातात.

राऊतांची राजकारणात एंट्री
सामनामध्ये संपादक झाल्यानंतर राऊत हे बाळासाहेबांच्या जवळ आले आणि हळूहळू शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाचा भाग बनले. मात्र, आंबेडकर महाविद्यालयातून बीटेकचे शिक्षण घेतलेले राऊत हे त्यांच्या हयातीतच शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेत सक्रिय होते. राजकारणातील विचारसरणी आणि दूरदृष्टी पाहून बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना शिवसेनेचे 'उपनेते' केले. यानंतर पक्ष वाढला आणि 2004 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते पहिल्यांदा राज्यसभेवर पोहोचले. येथे ते शिवसेनेचे नेतेही होते. राऊत हे संसदीय आणि गृह विभागाशी संबंधित समित्यांचे सदस्यही आहेत. 2005 ते 2009 दरम्यान राऊत हे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्यही होते.

राऊतांना राजकारणात आणणारेही बाळासाहेब ठाकरे होते. ते सलग चार वेळा शिवसेनेचे खासदार आहेत.
राऊतांना राजकारणात आणणारेही बाळासाहेब ठाकरे होते. ते सलग चार वेळा शिवसेनेचे खासदार आहेत.

'मविआ'साठी महत्त्वाची भूमिका

संजय राऊत हे 2010, 2016 आणि 2022 मध्ये सलग शिवसेनेचे राज्यसभा खासदार राहिले आहेत. चार वेळा खासदार असणारे संजय राऊत हे 2019 च्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या निवडणुकीनंतर चर्चेत आले. महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकत्र आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. संजय राऊतांचे राज्यातील इतर राजकीय नेत्यांसोबतही चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत त्यांचे जवळचे संबंध असल्याचे म्हटले जाते. महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या हाती संजय राऊत यांनीच दिले होते. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री असताना राऊत तिन्ही पक्षाच्या नेत्यांना सांभाळायचे काम करायचे.

शिवसेनेत बंडखोरी होऊनही राऊत उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले.
शिवसेनेत बंडखोरी होऊनही राऊत उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले.

बंडखोरीनंतरही ठाकरेंसोबत

संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. शिवसेनेतून अनेकांनी बंडखोरी केल्यानंतरही राऊत सतत उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते बंडखोरांवर टीका केल्याचे आपण पाहिले असेल. शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता, चित्रपटातील डायलॉग शेअर करत राऊत विरोधकांवर टीका करत असतात.

बातम्या आणखी आहेत...