आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेवेंद्र फडणवीस यांना मी एक सल्ला देऊ इच्छितो की, ते राजकारण जुने खिलाडी आहेत, त्यामुळे त्यांनी या प्रकरणात जास्त लक्ष देऊ नये. पहाटेचा गोंधळ तुम्ही चांगलाच अनूभवला असेल. त्यामुळे आपली प्रतिष्ठा धुळीत मिळवू नये, अन्यथा तुमच्याच प्रतिष्ठेला धक्का बसेल, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असून, त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रीय कार्यकारिणी प्रत्येक पक्षासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आज शिवसेना कार्यकारिणीची बैठक होणार असून, त्यात आम्ही सर्वजण सहभागी होणार आहोत. त्यात पार्टीच्या स्वभिमान आणि भविष्याबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच काही नियुक्त्या देखील केल्या जाणार आहे. शिवसेना पक्ष हा राज्यात आणि देशातही खूप मोठा आहे. शिवसेना पक्षासाठी आम्ही घाम गाळले, त्यामुळे शिवसेनेला कोणीही हायजॉक करू शकत नाही.
शिवसेना आमच्या रक्ताची
शिवसेना पक्षासाठी शेकटो लोकांनी आपले बलिदान दिले असून, आमच्या रक्तापासून शिवसेना तयार झाली आहे. भाजप पैशांच्या जीवावर शिवसेना विकत घेऊ शकत नाही, अशी टीका देखील राऊतांनी यावेळी भाजपवर केली. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा केली जाणार आहे, असेही राऊत म्हणाले.
हायजॉक करू शकत नाही
ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. बाळासाहेब ठाकरे देखील सांगायचे की, माझ्या पाठीमागे हजारो शिवसैनिक आहेत. त्यामुळे मी शिवसेना प्रमुख आहे. आजही हजारो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहे. शिवसेनेला कुणीही हायजॉक करू शकत नाही, असा इशारा राऊतांनी भाजपला दिला आहे.
बकरीसारखे फिरू नका
एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट करत म्हटले आहे की, आमदारांच्या कुटुंबाची सुरक्षा काढण्यात आली असून, याची जबाबदारी सरकारची आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, आमदारांनी पलायन केले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा सरकारची नाही, त्यांना जी सुरक्षा आहे ती आहे ती आमदार म्हणून आहे आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा दिली जात नाही, असे उत्तर राऊतांनी दिले. पुढे ते म्हणाले की, तुम्ही महाराष्ट्रात या, तुम्ही स्वत:ला वाघ म्हणतात तर एकडे तिकडे बकरीसारखे फिरू नका, अजूनही वेळ गेलेली नाही, असा सल्ला देखील राऊतांनी दिला.
खेला हो बे
कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढण्यात आलेली नाही. लोकांच्या मनात प्रचंड राग आहे. भविष्यात मोठा विस्फोट होऊ शकते. आम्हाला विश्वास आहे की, जेव्हा हे आमदार मुंबईत येतील तेव्हा हे शिवसेनेचे असतील, तेव्हा कुठे "खेला हो बे" सुरू होईल, असा विश्वास देखील राऊतांनी व्यक्त केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.