आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईडी कोठडीतून जामिनावर बाहेर आलेले फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत आज उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर पोहचलेत. येथे त्यांची आदित्य ठाकरे राऊत यांचे गळाभेट घेत स्वागत केले.
ईडीने राऊतांना मनी लॉड्रिंगप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर एकशे दोन दिवस कोठडी घालवल्यानंतर राऊतांना काल जामीन मंजूर झालाय. त्यामुळे ते पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आलेत.
आज भेटीगाठी
संजय राऊत यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर एक पत्रकार परिषद झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपण भारत जोडो यात्रेला जाणार नसल्याचे सांगितले. मात्र, आदित्य आणि आपले नेते सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. उपस्थित राहणार आहेत. तर आदित्य ठाकरे यांनी आपण उद्या नांदेड येथे भारत जोडो यात्रेत जाणार आहे. तिथे जो काही मार्ग असेल, तो चालणार असल्याचे सांगितले.
राऊत म्हणाले की...
भारत जोडो यात्रेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या नांदेड येथील सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेलाही राऊत यांची उपस्थिती असण्याची शक्यता व्यक्त होतेय. याबाबत राऊत यांना विचारले असता नेतृत्वाने सांगितले असता जाईन, असे उत्तर त्यांनी दिले.
पवार जाणार नाहीत
भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार नाहीत. शरद पवारांची तब्येतही म्हणावी तशी ठीक नाही. त्यामुळे ते शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनालाही शेवटच्या दिवशी उपस्थित राहिले. त्यांचे भाषणही दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवले. त्यामुळे पवारही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.