आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्राचाळ घोटाळा:संजय राऊतांच्या जामिनासाठी सुप्रीम कोर्टात जाणार नाही : आ.  सुनील राऊत

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राऊत यांच्या जामिनासाठी आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार नसल्याचेही सुनील राऊत यांनी सांगितले.पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत असून जामिनासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. सुनील राऊत म्हणाले की, संजय राऊत यांच्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची वेळ येणार नाही. मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून त्यानंतर काय होते ते बघू, संजय राऊत यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याच्याशी त्यांचा काडीचाही संबंध नाही. फक्त संजय राऊत यांना अटक करून शिवसेनेचा आवाज बंद करायचा, याच कारणामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

राऊत अ‌ॅक्शन मोडवर : गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत पत्राचाळप्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आहेत. त्यांना अजूनही जामीन मंजूर केलेला नाही. या पार्श्वभूमीवर शनिवारी आ. सुनील राऊत दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. गेल्या एक महिन्यापासून ईडीकडून संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांना अजूनही जामीन मंजूर झाला नसल्याने त्यांच्या जामिनासाठी भाऊ सुनील राऊत अ‌ॅक्शन मोडवर आले आहेत.

ठाकरेंची घेतली भेट दिल्लीला जाण्यापूर्वी सुनील राऊतांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या या दौऱ्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यावर बोलताना सुनील राऊत म्हणाले की, “खासदार राऊत यांचे घर दिल्लीमध्ये आहे, त्याबाबतची परिस्थिती पाहण्यासाठी मी दिल्लीत आलो आहे. मी काेणाचीही राजकीय भेट घेतलेली नाही, वकिलांशी मी चर्चा केलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...