आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sanjay Raut's Attack On BJP; They Are Talking Like The Script Given To Bommai, BJP's Conspiracy To Drop The Issue Of Insulting Shiv Raya

संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल:शिवरायांच्या अपमानाचा विषय मागे पडावा म्हणून बोम्मईंनी सीमावाद काढला

मुंबई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवरायांचा अपमानाचा विषय मागे पडावा म्हणून भाजपचे हे कारस्थान असल्याचा आरोपही त्यांनी केला, तर बोम्मईंना स्क्रिप्ट दिली त्या प्रमाणे ते बोलतायत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून या संदर्भात त्यांनी मविआच्या नेत्यांची भेट घेतल्याचे सांगितले आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर जो अचानक हल्ला केला आहे, त्या मागे मोठे कारस्थान असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपकडून जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. यात भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी असो की राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिखलफेक केली आहे.

महाराष्ट्रात संतापाची लाट

महाराष्ट्रात सरकारविरोधात संतापाची लाट ऊसळली आहे. हा सर्व विषय मागे पडावा म्हणून बोम्मईंना पुढे करत सीमा भागातील गावांवर हक्क सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांनी दुसऱ्या विषयाकडे वळावे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान विसरावा यासाठी हे वक्तव्य करण्यात आले आहे.

हे सगळं स्क्रिप्टेड

भाजपचे मुख्यमंत्री भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यावर असा हल्ला करत नाही, असे म्हणत त्यांनी यामागे षंडयत्र असल्याचा आरोप केला आहे. ही सर्व स्क्रिप्ट ठरलेली आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेने महाराजांचा अपमान विसरून जात सरकारवरील संताप कमी व्हावा, यासाठी हा विषय पुढे करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेने 69 हुतात्मे दिले

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राची एकही इंच जागा कुणाला देणार नाही, सरकार दुबळे असले तरी इथे शिवसेना आहे. बाळासाहेबांनी यासाठी 3 महिने तुरुंगवास भोगाला आहे तर शिवसेनेने 69 हुतात्मे दिले आहेत, याची आठवणही संजय राऊत यांनी करून दिली आहे. यापुढेही हुतात्मे लागले तरी आम्ही देऊ आणि तरुंगात जाऊ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

जनतेचा सरकारवर विश्वास नाही

राऊत म्हणाले की, महाराष्ट्राला खोके सरकारवर विश्वास नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बोलण्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही यांना पैसे दिले की हे महाराष्ट्राला विसरतील असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जगावला आहे. पण शिवसेना महाराष्ट्राला कधीच विसरणार नाही

बातम्या आणखी आहेत...