आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर केलेल्या खंडणी वसुलीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचे ५ अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक ( एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी (५ एप्रिल) दिली.
संजय राऊत यांनी फेब्रुवारीमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. या आरोपानंतर गृह खात्याकडून दखल घेतली जात नव्हती. राऊत यांनी गृह खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्यानंतर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वळसे पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत ईडीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याबाबत चर्चा झाली होती.
...तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचीही राज्य सरकार करू शकते
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कर्मचाऱ्याविरोधात त्याच्या कार्यालयीन कामांशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकरण असेल तर ते केंद्रीय तपास यंत्रणेकडे चौकशीला दिले जाते. मात्र त्याच्या कार्यालयीन कामांव्यतिरिक्त अफरातफरीची काही तक्रार असल्यास अशा कर्मचाऱ्यांवर राज्यात गुन्हा नोंद होऊ शकतो आणि राज्य पोलिस त्याची केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय चौकशीसुद्धा करू शकतात.
दिव्य मराठी एक्सपर्ट व्ह्यू सुरेश खोपडे, निवृत्त आयपीएस अधिकारी, पुणे
१. ईडीची भीती दाखवून मुंबईतील ७० व्यावसायिकांकडून १७ कोटी ते १४ लाखांपर्यंतच्या खंडण्या उकळण्यात आल्याची तक्रार शिवसेनेचे मुंबई पालिकेतील स्वीकृत नगरसेवक अरविंद भोसले यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना ८ मार्च २०२२ रोजी दिली होती. अशीच तक्रार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र पाठवून केली होती.असे आरोप
२. तक्रार अर्जात ज्यांच्याकडून खंडण्या उकळण्यात आल्या त्यांची नावे असून त्यात दिवाण हाउसिंग फायनान्स, इंडिया बुल्स रिअल इस्टेट, लार्सन अँड टुब्रोसारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. ऑनलाइन खंडण्यांचा आकडा ५८ कोटी ९३ लाख ६७ हजार ८८९ इतका आहे.
३. या प्रकरणात जितेंद्र नवलानी हा कळीचा सूत्रधार आहे. नवलानी मुंबईतील व्यावसायिक आहे. याच्या ७ कंपन्यांच्या खात्यात या खंडण्यांच्या सर्व रकमा जमा झाल्याचा आरोप आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.