आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM शिंदे कर्नाटकात:नकली शिवसेना, ढोंगी हिंदूत्व, महाराष्ट्राचे वैरी; मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला, संजय राऊतांची टीका

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. कर्नाटकात डबल इंजिन सरकार येणार असा दावा यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे. मात्र शिंदेंच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नकली शिवसेना! ढोंगी हिंदूत्व! महाराष्ट्राचे वैरी' असे म्हणत जोरदार टीका केली आहे.

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. सर्वपक्षीयांकडून निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेक नेते कर्नाटक निवडणुकीत ऑन फिल्ड उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आणि उद्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते कर्नाटकामध्ये भाजपा उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार आहेत.

मुख्यमंत्र्याच्या या दौऱ्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. राऊत यांनी ट्विट करत एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागले आहे. संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात भारतीय जनता पक्षाच्या प्रचारास गेले आहेत. शिवसेना आमचीच.. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच असा डांगोरा ते रोज पिटत आहेत. आता काय? कर्नाटकचे मुख्यमंत्री बॉम्माई म्हणतात, महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकं उचापती आहेत त्यांना आम्ही धडा शिकवू. आणि शिंदे त्याच बॉम्माईच्या पखाली वाहत आहेत.

बाळासाहेबांनी हकालपट्टीच केली असती

संजय राऊत पुढे म्हणाले, शिंदे व त्यांची टोळी सीमा भागात फिरकली नाही. उलट एकीकरण समितीच्या विरोधातील भाजपा उमेदवारांना खोके पाठवून मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला. सीमा भागातील एकीकरण समितीचे उमेदवार पराभूत व्हावेत म्हणून शिंदे यांनी जोर लावला आहे. बाळासाहेबांनी या कृत्याबद्दल शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टीच केली असती. एकशे पाच हुतात्म्यांशी ही बेइमानी आहे. महाराष्ट्र ही गद्दारी लक्षात ठेवील.

युतीचा प्रचार करायला आलोय-शिंदे

कर्नाटक निवडणुकीत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, युतीची प्रचार करायला मी याठिकाणी आलेलो आहे. याठिकाणी मराठी माणसांचे 103 वर्षे जुने महाराष्ट्र मंडळ आहे. त्यांची मी भेट घेणार आहे. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकात डबल इंजिन सरकार येणारच. कर्नाटकमधील मतदार भाजपला मतदान करुन बहुमताने निवडून आणतील, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

संबंधित वृत्त

दौरा:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंगळुरमध्ये दाखल, कर्नाटकात भाजपचा प्रचार करणार, म्हणाले- डबल इंजिन सरकार येणार

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. सर्वपक्षीयांकडून निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेक नेते कर्नाटक निवडणुकीत ऑन फिल्ड उतरले आहेत. आता भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. कर्नाटकात डबल इंजिन सरकार येणार असा दावा यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे. वाचा सविस्तर