आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी फेटाळली:संजय राऊत यांची 14 दिवस मुदतवाढीची मागणी फेटाळली, ईडीसमोर 1 जुलै रोजी हजर राहावे लागणार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईडीसमोर 14 जुलै रोजी हजर राहावे लागणार

एक हजार कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी १४ दिवसांची मागितलेली मुदत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) फेटाळून लावली. एवढी मुदत देता येत नसल्याचे सांगत ईडीने राऊत यांना १ जुलै रोजी कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले. त्यांना मंगळवारी दुसऱ्यांदा चौकशीची नोटीस बजावण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी ईडीने राऊत यांना चौकशीसाठी मंगळवारी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर राऊत यांनी, मला वाटेल तेव्हा चाैकशीला सामोरा जाईन, असे ट्वीट केले. दरम्यान, मंगळवारी सकाळीच ते अलिबागला पक्षाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमाला गेले.

मंगळवारी राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नसले तरी त्यांच्या वकिलाने बलार्ड इस्टेट येथील कार्यालयात उपस्थिती लावली. आम्हाला सोमवारी नोटीस मिळाली. एवढ्या कमी वेळेत कागदपत्रे तयार करता आली नाहीत. यामुळे १४ दिवसांचा वेळ वाढवून देण्याची विनंती त्यांनी केली. मात्र, ईडीने ती फेटाळून लावली.