आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्णबच्या अटकेवर राऊत:अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - 'या कारवाईशी राज्य सरकारचा संबंध नाही'

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई पोलिस कुणावर अन्याय करत नाहीत, कुणावर सूडाने कारवाई करत नाही

एका आर्किटेक्टच्या आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्णब गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा संबंध असल्याचे काही नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राऊत म्हणाले की, 'महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. येथे सर्वकाही कायद्यानुसार केले जाते. अर्णब गोस्वामीवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचा ठाकरे सरकारशी कोणताही संबंध नाही' तसेच पुढे बोलताना राऊत म्हणाले की, 'मुंबई पोलिस कुणावर अन्याय करत नाहीत, कुणावर सूडाने कारवाई करत नाही. त्यामुळे जर कोणी गुन्हा केला असेल आणि तो दडपला असेल तसेच त्यासंदर्भातील काही तपासाचे, पुराव्यांचे धागेदोरे हाती आल्यानंतरच पोलिसांनी कारवाई केली असेल.' असे म्हणत त्यांनी या कारवाईचे समर्थन केले आहे. संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

काय आहे प्रकरण?

मुंबईमधील इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाच्या फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आली होती. यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे देण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापन करण्यात आली होते. यापूर्वी अर्णब गोस्वामी याची याप्रकरणी चौकशी झाली होती. कारवाई झाली नव्हती. आज या प्रकरणात अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.