आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती, तेव्हापासून ते कोठडीत होते. जामीन मंजूर झाल्याने बुधवारी पावणेसातच्या सुमारास संजय राऊत व प्रवीण राऊत आर्थर रोड कारागृहातून बाहेर आले. या वेळी शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तुरुगांबाहेर गर्दी करून राऊतांचे जंगी स्वागत केले. कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर फटाके फोडून मोठा जल्लोष केला. आम्ही लढणारे आहोत, लढत राहू, अशी प्रतिक्रिया तुरुंगाबाहेर येताच संजय राऊतांनी व्यक्त केली.
तुरुंगाबाहेर येताच उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना हात उंचावून आणि मशाल चिन्ह असलेले शिवसेनेचे भगवे मफलर उंचावून संजय राऊत यांनी अभिवादन केले. या वेळी १०२ दिवसांपूर्वी तुरुंगात जाताना त्यांचा जो आक्रमक अंदाज होता तोच पुन्हा एकदा पाहायला मिळाला. राऊत म्हणाले, माझी अटक बेकायदा होती, हे न्यायालयाने सांगितले. न्यायालयाने सांगितले म्हणजे खरेच असणार.
राऊतांचे कारागृहातील १०० डेज १. ईडीचे अधिकारी ३१ जुलै रोजी सकाळी ७ वाजताच संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले. ९ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. २. प्रथम १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ३. सप्टेंबर १९ रोजी कोठडी चौदा दिवसांनी वाढवत ४ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. ४. नोव्हेंबरपर्यंत २ कोठडी. ९ नोव्हेंबरपर्यंत निकाल राखीव . ५. नोव्हेंबर ९ रोजी संजय राऊत व प्रवीण राऊत यांच्या जामिनावर सुनावणी घेत दोघांनाही जामीन मंजूर केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.