आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपला सुनावले:कंगना रनोटला न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - 'हे' भाजपाला मान्य आहे का?

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊतांनी कंगनाला न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भाष्य केले.

अभिनेत्री कंगना रनोटवर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर आज मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आला. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली होती असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. तसेच कंगनाला पालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात आली आहे. यानंतर भाजपने शिवसेनेवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊतांनी कंगनाला न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपला सुनावले आहे. राऊत म्हणाले की, 'अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलिसांना माफिया म्हटले आणि मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना केली. कंगनाला कोर्टाकडून दिलासा मिळाला यानंतर उत्साही झालेल्या भाजपाला हे मान्य आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच पुढे ते म्हणाले की, 'कोर्टाच्या निर्णयाविरोधात किंवा न्यायाधीशांविरोधात काही बोलणे हा कोर्टाचा अवमान ठरतो. मात्र मग महाराष्ट्र आणि मुंबईबाबत कुणी अशी वक्तव्य करत असेल तर ती बदनामी नाही का?' असाही प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

न्यायालयाने काय म्हटले?
मुंबई महापालिकेकडून अभिनेत्री कंगना रनोटच्या बंगल्यावर झालेली कारवाई बेकायदा होती असे शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, कंगनाला ही कारवाई थांबवण्यासाठी कायदेशीर मदत सुद्धा मिळू नये असे प्रयत्न झाले. मुळात बीएमसीने (बृहन्मुंबई महापालिका) कंगनाच्या बंगल्यावर कारवाईसाठी जी नोटिस बजावली होती तीच हायकोर्टाने रद्दबातल ठरवली. ही कारवाई कंगनाच्या सोशल मीडियावर झालेल्या कॉमेंट्सवरून झाली असावी असेही कोर्टाने म्हटले. सोबतच, कंगनाला सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या विधानांवर संयम बाळगण्याची ताकीद दिली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser