आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपाल विमान प्रकरण:जे काही झालं ते नियमाला धरूनच, भाजपच्या लोकांनी आरोप करण्याची गरज नाही; संजय राऊतांनी फटकारले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 आमदारांच्या नियुक्तीला वेळ लावताय तो अपमान नाही? -राउत

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विमान प्रवासाला परवानगी नाकारल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावरून जे काही झालं ते नियमाला धरूनच झालेलं आहे. भाजपच्या लोकांनी आरोप करण्याची गरज नाही, राज्यपाल हे भाजपचे नाहीत तर ते महाराष्ट्राचे आहेत' अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

भाजप नेत्यांकडून होत असलेल्या टीकेनंतर संजय राऊत म्हणाले की, 'राज्यपाल विमान प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर बोलणे झाले आहे. जे काही झालं ते नियमाला धरूनच झालेले आहे. भाजपच्या लोकांनी आरोप करण्याची गरज नाही, राज्यपाल हे भाजपचे नाहीत तर ते महाराष्ट्राचे आहेत.'

यावेळी संजय राऊत यांनी राज्यपालांवरही निशाणा साधला. 'राज्य सरकारने 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची शिफारस केली आहे. पण अजूनही या बारा आमदारांच्या नियुक्त्या होत नाहीत, हा राज्यघटनेचा सर्वात मोठा अपमान आहे,' असे राऊत म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचे समोर आले आहे. राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नाही. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचे कळाले.

बातम्या आणखी आहेत...