आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांची प्रतिक्रिया:पोटनिवडणुकीतील पराभवामुळे पेट्रोल 5 रुपये कमी करण्यात आले, 50 रुपये कमी करायचे असेल तर भाजपचा संपुर्ण पराभव करावा लागेल - संजय राऊत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षभरापासून इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. देशातील अनेक राज्यात पेट्रोल शंभरी गाठली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत देखील पेट्रोल 115 रुपयांच्या पार गेले होते. अशातच सणासुदीच्या पार्श्वभुमीवर दिवाळीच्या एक दिवस अगोदर केंद्र सरकारने काहीसा दिलासा दिला आहे.

केंद्राने पेट्रोलवर 5 रुपये तर डिझेलवर 10 रुपयांची करकपात केली आहे. त्यामुळे हा काहीसा दिलासा नागरिकांना मिळाला आहे. त्यावरून आता विरोधक मोदी सरकारवर टीका करतांना पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्राच्या इंधन कपातीच्या निर्णयावरून भाष्य केले आहे.

"पोटनिवडणुकीतील पराभवामुळे पेट्रोलची किंमत 5 रुपये कमी झाली 50 रुपये कमी करायचे असतील कर भाजपचा संपुर्ण पराभव करावा लागेल" असे संजय राऊत म्हणाले. दिवाळी साजरी करण्यासारखे वातावरण नाही. महागाई खूप वाढली आहे, दिवाळी कशी साजरी करणार."

लोकांना कर्ज काढून सण साजरे करावे लागत आहे, तरी देखील आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो, 2024 साली हे ही दिवस बदलतील. अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. "मोठे मन दाखवायला मन असायला पाहिजे, केंद्राने किमान 25 रुपये कमी करायला पाहिजे होते. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून बेहिशेबी पैसे सरकारने कमावले आहेत" असे देखील राऊत म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसने देखील केंद्र सरकारवर टीकास्त्र केले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्राच्या या निर्णयाची खिल्ली उडवत, भीतीपोटी हा निर्णय घेण्यात आला असे म्हटले आहे. प्रियंका यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "हा तर भीतीपोटी घेतण्यात आलेला निर्णय आहे. मनापासून नाही. वसूली सरकारला आपण येणाऱ्या निवडणुकीत या लुटीचे उत्तर नक्कीच देऊ" असे ट्विट करत प्रियंकाने भाजपवर हल्लाबोल केला आहे.

इंधनमुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते, त्यावर आता दिवाळी तोंडावर मोदी सरकारने दिलासा देण्याच्या नावावर पेट्रोलमध्ये पाच रुपये तर डिझेलमध्ये दहा रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याची राजधानी मुंबईत पेट्रोल हे 115 रुपयांच्या पार गेले होते. तर दिल्लीत देखील पेट्रोलसाठी 110 रुपये मोजावे लागत होते.

बातम्या आणखी आहेत...